समर्थ रंगभूमीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

समर्थ रंगभूमीतर्फे शालेय साहित्याचे वाटप
Published on

rat१p१.jpg ः
२४M९३९७८
संगमेश्वर ः तालुक्यातील कोळंबे मराठी शाळेत येथील समर्थ रंगभूमीतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या वेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ आदी.
---

समर्थ रंगभूमीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ः येथील समर्थ रंगभूमी या संस्थेतर्फे सलग २१व्या वर्षी संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वह्या व कंपासपेट्यांचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या या उपक्रमाचे कोळंबे मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्वांनी कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक खापरे यांनी उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. चंद्रमोहन देसाई यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेत येता-जातांना रस्त्यावरून कुठल्या बाजूने चालावे, नियम कसे पाळावेत याबाबत मिलिंद सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समर्थ रंगभूमीने २००३पासून ४२ शाळा व दोन संस्थांमधील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अधिक उत्साहाने काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांनाच मिळते, असे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मनोगतातून विषद केले. संजय मेस्त्री यांनीही संस्थेच्या सर्वच उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षकवृंद तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी मिलिंद सावंत, श्रीकांत पाटील, सुहास साळवी, चंद्रमोहन देसाई, जयदेव शिंदे, श्रद्धा पाटील, सरोज पवार, सुशील जाधव, आबा सावंत, प्रदीप मोरे यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.