- देवरूख शाळा नं. १ जवळील पुलाची डागडुजी

- देवरूख शाळा नं. १ जवळील पुलाची डागडुजी

- rat१p३.jpg -
२४M९३९८०
देवरूख ः धोकादायक पुलाचा परिसर.

देवरूख शहरातील मराठी शाळेजवळील पुलाची डागडुजी

नगरपालिका प्रशासनाकडून दुरुस्ती; धोका टळला, १५ लाख रुपये खर्च अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ ः देवरूख शहरातील मराठी शाळा नं. १ जवळच नदीवरील वरचीआळीकडे ये-जा करण्यासाठीचा जुना छोटा पूल गतवर्षीच्या पावसात एका बाजूने खचला होता. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला होता. तो पूल तातडीने दुरुस्त करण्यास नगर पालिका प्रशासनाने दुर्लक्षच केले. आता भरपावसाळ्यात संभाव्य धोका लक्षात आल्यावर त्याचे बालंट येऊ नये यासाठी नगर पालिका प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.
देवरूख वरचीआळी, भायजेवाडी, कुंभारवाडी, मोरेवाडी, शिंदेवाडी, गेल्येवाडी वाडेश्वर स्मशानभूमी व हरपुडेकडे जाणे-येणे यासाठी पूर्वी शिवकालीन दगडी पूल होता. त्या दगडी पुलावरून वाहन रहदारी करणे अवघड होत असल्याने त्या शिवकालीन पुलाच्या लागूनच वॉर्ड ४ मधील प्राथमिक मराठी नं. १ शाळेच्या जवळच असलेला हा छोटा पूल १९७६ च्या सुमारास बांधण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थी व वाहनांची वाहतूक व्यवस्था सुरळीत होत होती. हा मुख्य रहदारी असलेल्या पुलाचा एक भाग खचत गतवर्षीच्या पावसात त्याला भगदाड पडले. त्यावर प्रशासनाने त्वरित दुरुस्ती न केल्याने व पाणीसाठा असल्याने ते भगदाड मोठे होत असल्याने न. प. ने त्यावरील वाहतूक बंद केली आणि तसा फलकही लावला; पण तो तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असताना ही प्रशासनाने दुर्लक्ष केले.
या दुरुस्तीसाठी अंदाजे १५ लाख रुपये खर्च अपेक्षित धरुन दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हा विकास निधीतून वा अन्य निधीतून तातडीने दुरुस्ती करून शाळकरी मुले व जनतेच्या रहदारीला होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी नगर पंचायतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी तत्कालीन नगरसेवक वैभव पवार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली होती.
----
बक्षिस रकमेतून दुरुस्ती नाही

पुलाचा विषय गतवर्षी मासिक सभेत उपस्थित करून आवाज उठवून सभागृहाचे लक्ष वेधले होते. तरीही हा धोकादायक पूल तातडीने दुरुस्तीसाठी वर्षभरात निधीसाठी प्रशासनाने लक्ष दिले नाही. बक्षीस मिळालेल्या १० लाखांतून हा पूल दुरुस्तीसाठी का नाही केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भरपावसाळ्यात भगदाड मोठे होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात आल्यावर ते भगदाड काँक्रिटने बुजवण्यात येणार असल्याचे नगर पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com