कोकण रेल्वे अध्यक्ष साधताहेत संवाद

कोकण रेल्वे अध्यक्ष साधताहेत संवाद

Published on

- rat१p१६.jpg-
P२४M९४००९
रत्नागिरी ः कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना.


कोकण रेल्वे अध्यक्षांचा कर्मचाऱ्यांशी संवाद

मनोबल वाढवण्याचा प्रयत्न ; सुरक्षीत प्रवासाचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः रेल्वे चालवताना कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत जेणेकरून हजारो लोकांचा प्रवास सुरक्षित होईल यावर मार्गदर्शन करताना कोकण रेल्वेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला.
सोमवारी (ता. १) रत्नागिरी येथील काजळी क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात झा यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे आणि कोकण रेल्वेचे अन्य अधिकारी यांच्यासह प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाशी थेट संबंधित असलेल्या रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेगाड्या चालवणारे लोको पायलट, असिस्टंट लोकोपायलट यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांशी झा यांनी संवाद साधला. हजारो प्रवाशांचा सुरक्षित प्रवास या मंडळींच्या हातामध्ये असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत, आपले आरोग्य आणि मानसिकता राखण्यासाठी काय केले पाहिजे यापासून कुटुंबीयांनी या व्यक्तींना कशा पद्धतीने सांभाळले पाहिजे याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ट्रेन चालवताना कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत जेणेकरून हजारो लोकांचा प्रवास सुरक्षित होईल, याबाबत झा यांनी सूचना दिल्या. लोको पायलट यांच्याबरोबरच तिकीट तपासनीस यांच्याशीही झा यांनी संवाद साधला. प्रवाशांशी थेट संबंध येणाऱ्या तिकीट तपासनीसांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता प्रवाशांशी संवाद साधावा, असे झा यांनी सांगितले. कोकण रेल्वेमार्गावरील विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. शनिवारी मडगाव येथे कार्यक्रम झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.