‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’
योजना जिल्ह्यात यशस्वी करू''

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात यशस्वी करू''

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’
योजना जिल्ह्यात यशस्वी करू''
ओरोस, ता. १ ः ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसारखी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महिला भगिनींना दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे भाजप सिंधुदुर्गच्यावतीने आभार मानतो. ही योजना पूर्ण जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप प्रयत्न करणार, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
याबाबत सावंत यांनी पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आहार पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ अशी योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणार असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यासंबंधीचे अर्ज शासनाने नेमून दिलेल्या साईटवर अपलोड करण्यासाठी भाजपच्यावतीने विशेष सहाय्य योजना केली आहे. या योजनेसाठी १५ जुलै ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. यातील सर्वांत महत्त्वाचा असणारा उत्पन्नाचा दाखला त्वरित मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालये व शासनमान्य सेवा केंद्र येथे शिबिरांचे आयोजन करावे, अशी विनंती महसूल यंत्रणेकडे केली आहे.महसूल अधिकारी वर्गानेही या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची ग्वाही दिली आहे. योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंत यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com