लांजातील फणस संशोधन केंद्राच्या जागेचा प्रश्न रखडला

लांजातील फणस संशोधन केंद्राच्या जागेचा प्रश्न रखडला

Published on

-rat१p२३.jpg-
P२४M९४०२६
लांजा ः कोकणात मोठ्या प्रमाणात फणसाचे उत्पादन होत असून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
--------

फणस संशोधन केंद्राच्या जागेचा प्रश्न रखडला

लांजासाठी ४० कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी ; प्रक्रियेसह उत्पादन पद्धतीवर संशोधन

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १ ः लांजातील फणस संशोधन केंद्राचा सुमारे ४० कोटी रुपयाचा प्रस्ताव कोकण कृषी विद्यापीठाने राज्य शासनाला सादर केला आहे; मात्र अद्याप या केंद्राच्या जागेचा प्रश्न निकालात निघालेला नाही. राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याने बहुचर्चित फणस संशोधन केंद्र रखडले आहे. पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा करून मूर्त स्वरूप यावे, अशी मागणी लांजातील शेतकऱ्यांनी केली आहे कोकणातील आमदारांनी हा प्रश्न लक्षवेधी करावा, ही मागणी होत आहे.

फणसाच्या लागवडीस तसेच प्रक्रियेस भविष्यात असलेला वाव लक्षात घेऊन लांजा येथे फणस संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता या संशोधन केंद्राला देण्यात आली आहे. याचा ४० कोटींचा प्रस्ताव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. देश आणि परदेशातील फणस जातींचा अभ्यास करणे, वाणांचा संग्रह, तुलनात्मक अभ्यास, फणसाचे गरे, फणस कुयरीची भाजी, तयार फणसाची भाजी, फणस पल्प व त्यापासून उत्पादने, ताज्या तसेच उकडलेल्या बिया व त्याची पावडर, वर्षभर फणसाचे उत्पादन, फणसाच्या स्वतंत्र जाती तयार करणे, पडीक जमिनीवर लागवड करणे, रोग, किडी, शाखीय व्यवस्थापनासाठी संशोधन करणे, शेतकऱ्यांना रोपवाटिका, उत्पादनपद्धती तसेच प्रक्रिया पदार्थ यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण राबवणे यासाठी हे संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
-----------
चौकट
रोजगार निर्मितीची संधी
लांजा येथील ५० एकर जागेवर हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाने कृषी परिषदेच्या बैठकीसमोर मांडलेल्या प्रस्तावात ४० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. कोकणात फणस मुबलक प्रमाणात मिळत असून, हे फळ पौष्टिक, आरोग्यदायी गुणधर्म असलेले फळपिक आहे. या फळाचे मूल्यवर्धन केल्यास त्याची मूल्यसाखळी निर्माण होऊ शकते तसेच त्यातून रोजगार निर्मितीही होऊ शकते. यासाठी विद्यापीठाने सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे
-----------
चौकट
५० एकर जागा हवी
तसेच फणसाच्या विविध जातींची दर्जेदार कलमे तयार करण्यासाठी रोपवाटिकाही उभारण्यात येणार आहेत. फणसाचे मूल्यवर्धित उपपदार्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी पिकलेले गरे, फणसाच्या बिया, पाती, सातल आणि आतील पाव आदींपासून उपपदार्थ बनवण्यावर संशोधन करण्यात येणार आहे. संशोधन केंद्रासाठी ५० एकर जमीन प्रस्तावित आहे. संशोधन केंद्रात सहा शिक्षक तर ८ शिक्षकेत्तर कर्मचारी, पाच वर्षांसाठी ४० कोटी अनुदानाची गरज असल्याचे प्रस्तावात आहे. देवधे, गवाणे या ठिकाणी ४० एकर जमीन या संशोधन केंद्राला देण्यासंदर्भात कोणत्याही सूचना राज्य सरकारने केलेली नाही.
-----------
कोट
फणस संशोधन केंद्रासाठी गेली सात वर्षे आम्ही प्रयत्न करत होतो. शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हे केंद्र मंजूर केले; मात्र गेली अडीच-तीन महिने आचारसंहिता असल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. या केंद्रासाठी लांजा कृषी विज्ञान केंद्र जागा उपलब्ध करून देणारा आहे. त्या बरोबरीने झापडे येथे सुरू असलेल्या देसाई यांच्या वैयक्तीक फणसावरील रिसर्च सेंटरच्याजवळ अन् संशोधन केंद्रासाठी जागा मिळते का, याबाबत प्राथमिक स्तरावर विचार सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये फणस संशोधन केंद्र संदर्भातील प्रश्न मार्गी लागेल.

- मिथिलेश देसाई, फणस किंग, लांजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.