संगमेश्वर ः  विलासदादा प्रबोधनी संस्था उभारणार

संगमेश्वर ः विलासदादा प्रबोधनी संस्था उभारणार

94199

संगमेश्वरात विलासदादा प्रबोधनी संस्था उभारणार
होडे कुटुंबीयांचा संकल्प ; संस्थेसाठी अठरा गुंठे जमीन विनामोबदला
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ः स्वतःला समाजसेवेत वाहून घेणारे विलास होडे यांच्या १६व्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार सूर्यकांत सुर्वे (शृंगारपूर) व रामचंद्र कुवळेकर (निवे बु.) यांना प्रचितगड विद्यालयाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विलासदादा प्रबोधनी संस्थेची स्थापना करत असल्याची घोषणा आणि संस्थेसाठी अठरा गुंठे जमीन विनामोबदला देत असल्याचे अंणदेरी येथील होडे कुटुंबीयांनी केली.
विलास होडे यांच्या १६व्या स्मृतिदिनी कारभाटले हायस्कूल येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाला आणि होडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी तांबेडी, कळंबस्ते आणि कारभाटले हायस्कूलमधील दहावी परीक्षेत एक ते तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कारभाटले हायस्कूलतर्फे रोख रक्कम, पुस्तक आणि पेन देऊन गौरवण्यात आले. नायरी गावचे निवृत्त कर्मचारी अवेज मोडक यांनी प्रतिवर्षाप्रमाणे कारभाटले हायस्कूलच्या होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या प्रसंगी (कै.) विलास होडे यांच्या स्मृतीला अभिवादन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष फैज पाटणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, माजी सभापती कृष्णा हरेकर, दिलीप पेंढारी, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोक जाधव, विलास होडे यांचे चिरंजीव विनय होडे, बाळू होडे, श्रीमती जोत्स्ना होडे, कृष्णा होडे, पांडुरंग घोरपडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, कुणबी विकास पतपेढी संस्था लांजा अध्यक्ष चंद्रकांत परवडी, दीपक जाधव, भाऊ गीते आदी उपस्थित होते. प्रस्तावना युयुत्सू आर्ते यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक समीर अत्तार यांनी केले.

चौकट
सामाजिक काम करणाऱ्यांना पुरस्कार
विलास होडे यांच्यासारखे काम करणाऱ्या व त्यांना अभिप्रेत असलेले काम सातत्याने करणाऱ्या व्यक्तींची होडे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. अभ्युद्य शिक्षण प्रसारक मंडळाला सातत्याने सहकार्य व विलास होडे यांच्याबरोबर सातत्याने संघर्षात उतरणाऱ्या सूर्यकांत सुर्वे, शृंगारपूर व बहुजन विकास आघाडीची स्थापना, सहकारी क्षेत्रातील काम व बेदखल कुळांच्या प्रश्नांची लढाई लढणाऱ्या रामचंद्र कुवळेकर, निवे बु।। यांची विलास होडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती, असे आर्ते यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com