योजनेसाठी तातडीने दाखले द्या

योजनेसाठी तातडीने दाखले द्या

Published on

योजनेसाठी तातडीने दाखले द्या

भाजप महिला मोर्चा ः वेंगुर्लेत तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेबाबत वय, अधिवास व उत्पन्नाचे दाखले वेळेवर द्यावेत, अशी मागणी वेंगुर्ले तालुका भाजप महिला मोर्चामार्फत केली आहे. याबाबत तसे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, ‘‘राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा होण्याच्या उद्देशाने ‘लाडकी बहीण’ योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. त्याबद्दल भाजप महिला मोर्चामार्फत मुख्यमंत्री शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे आभार मानतो.’’ यावेळी वेंगुर्ले महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा प्रभुखानोलकर, वृंदा गवंडळकर, तालुका महिला कार्यकारिणी सदस्य जानवी कांदे, शहर महिला अध्यक्ष श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस आकांक्षा परब, पाल सरपंच कावेरी गावडे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल पालकर, तालुका महिला उपाध्यक्ष श्रद्धा धुरी, शहर सरचिटणीस रसिका मठकर, प्रार्थना हळदणकर आदी उपस्थित होते. दरम्यान, तत्पूर्वी तालुका कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी तालुक्यात आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची, तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्यासाठी ६६ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आणि २०२४ च्या पावसाळी अधिवेशानात प्रामुख्याने महिला, विधवा, दिव्यांग, वृद्ध, शेतकरी या प्रवर्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले.
-----
शनिवार, रविवारीही यंत्रणा राबवा
योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारा घरपत्रक उतारा व वय अधिवास काढण्यासाठी जन्माचा दाखला १५ दिवसांत मिळणे अशक्य आहे. त्यामुळे हे दाखले तातडीने लाभार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी केली आहे. दाखले सादर करतेवेळी तहसील कार्यालयात वीज नसणे, डेस्कवर दाखले भरण्यास अधिकारी नसणे किंवा इंटरनेटची समस्या, कॉम्प्युटर नसणे आदी कारणांमुळे शैक्षणिक दाखलाही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे दाखले मिळण्यासाठी शनिवार व रविवार या दिवशी विशेष यंत्रणा राबविण्यात यावी. जेणेकरून योजनेतील महिलांना सतत हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी मागणी निवेदनात आहे.
94296

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.