‘वेंगुर्ला मिडटाऊन’चे कार्य कौतुकास्पद

‘वेंगुर्ला मिडटाऊन’चे कार्य कौतुकास्पद

Published on

‘वेंगुर्ला मिडटाऊन’चे कार्य कौतुकास्पद

व्यंकटेश देशपांडे ः नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ ः रोटरी इंटरनॅशनल ही जागतिक पोलिओ मुक्तीसाठी अविरतपणे कार्यरत असणारी संस्था असून, ‘सव्हिस अबाव्ह सेल्फ’ हे ब्रीदवाक्य घेऊन जगातील लाखो रोटरीयन निरपेक्ष वृत्तीने सेवा विविध प्रकारच्या माध्यमातून देत आहेत. या जागतिक संस्थेचा भाग असणारी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन या शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पदग्रहण अधिकारी व प्रमुख अतिथी माजी प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी काढले.
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या निवडलेल्या २०२४-२५ साठीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच येथील स्वामिनी मंडपम् येथे झाला. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे नवनियुक्त प्रेसिडेंट योगेश नाईक, सेक्रेटरी नोटरी अॅड. प्रथमेश नाईक, ट्रेझरर मुकूल सातार्डेकर, क्लब असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर, असिस्टंट गव्हर्नर डॉ. विद्याधर तायशेटे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी झोन सिंधुदुर्ग राजेश घाटवळ, माजी अध्यक्ष शंकर वजराटकर, पंकज शिरसाट आदी उपस्थित होते.
पदग्रहण सोहळ्याची सुरुवात कथ्थक नृत्यांगना निरजा माडकर हिच्या गणेश वंदना नृत्याने झाली. मावळते अध्यक्ष शंकर वजराटकर यांनी प्रास्ताविक केले. मागील रोटरी वर्षातील राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला, एजी सचिन गावडे, डिस्ट्रिक्ट व क्लबचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. यानंतर नवनियुक्त प्रेसिडेंट योगेश नाईक, सेक्रेटरी अॅड. नाईक, ट्रेझरर मुकुल सातार्डेकर व बोर्ड ऑफ डायरेक्टरचा पदग्रहण सोहळा पदग्रहण अधिकारी माजी प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते झाला. यावेळी नवीन सदस्य म्हणून उदय दाभोलकर, आंदुर्लेकर व अंकुश गावडे यांचे स्वागत करण्यात आले.
योगेश नाईक यांनी आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची घोषणा करून, सर्वांच्या सहकार्याने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व आरोग्य विषयक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन परिवारातील यश्वी ठाकूर, प्रिशा नाईक, आर्ची नाईक, भूमी नाईक, विभांशू उबाळे या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मिळविलेल्या यशानिमित्त त्यांचा कुटुंबीयांसमवेत गौरव करण्यात आला. अॅड. नाईक, काजू उद्योजक दीपक ठाकूर व अंकुश गावडे यांचाही गौरव करण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर व दिलीप गिरप, अॅड. आनंद बांदेकर यांचा गौरव करण्यात आला. जन्मतः अंध असूनही शास्त्रीय गायन, हार्मोनिअम व तबला या तीन विषयांत विशारद पदवी मिळविणारे यंदा पखवाज विशारद परीक्षेची तयारी करणाऱ्या सचिन पालव व सुरक्षित प्रवास सुविधा देणारे एसटीचालक गुरूप्रसाद गावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
94304

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.