करंबेळे घाटात खचलेला रस्ता ठरतोय धोकादायक

करंबेळे घाटात खचलेला रस्ता ठरतोय धोकादायक

Published on

94392

करंबेळे घाटात रस्ता खचला
सुरक्षिततेसाठी बॅरल; अपघाताची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता.२ : देवरुख-संगमेश्वर या मार्गावर करंबेळे घाटात रस्ता खचत असल्यामुळे बांधकाम विभागाने तिथे बॅरल लावून सावधगिरी बाळगा अशा सुचना दिल्या आहेत. मात्र अरूंद रस्त्यामुळे खचलेल्या भागात वाहने एकमेकांच्या समोर येत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पहिल्याच पावसात देवरुख-संगमेश्वर या मार्गावरील करंबेळे घाटातील रस्ता एका बाजून खचत आहे. पाऊस पडला त्यात वाढ होत असल्याने तेवढा भाग वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे. तातडीने रस्त्याचे काम करणे शक्य नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तिथे बॅरल लावून सावधगिरी बाळगा अशा सूचना दिली आहे. मुसळधार पावसात रात्री या मार्गावरून वाहने चालवताना चालकांची गैरसोय होत आहे. वाहने एकमेकासमोर येऊन धडकण्याची शक्यता आहे. या भागात कायमस्वरुपी उपाययोजना केली गेली नाही तर अपघाताची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्यामुळे सिंधुदुर्ग किंवा गोव्याकडे जाणारी वाहने संगमेश्वर-देवरूख रस्त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे वाहनांची रेलचेल वाढली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहन चालकांना घाटातील वळणाचा अंदाज येत नसल्यामुळे सध्या या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात करंबेळे येथील खचलेल्या भागाची भर पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.