सद्गुरू मियाँसाब यांना सावंतवाडीत वंदन

सद्गुरू मियाँसाब यांना सावंतवाडीत वंदन

सद्‌गुरू मियाँसाब यांना सावंतवाडीत वंदन

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक ः पुण्यतिथीदिनी समाधीस्थळी चादर अर्पण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः संतांची भूमी असणाऱ्या कोकणातील सद्‌गुरू मियाँसाब हे सर्व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन धर्मातील अध्यात्माच्या प्रगतिपथावर पाऊल टाकणारे सद्‌गुरू आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते. सर्व धर्मांचा अंतिम हेतू ‘परमेश्वर’ ही शिकवण देणाऱ्या सद्‌गुरू मियाँसाब यांचा ७९ वा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. कोलगाव येथील समाधीस्थळी सावंतवाडीसह जिल्हाभरातील भक्तगणांनी नतमस्तक होत चादर अर्पण केली.
पूर्वीचे सावंतवाडी संस्थान अर्थात बांदा येथील रहिवासी मुसलमानी धर्म पंथांतील ‘सद्‌गुरू’ घराणे होते. या घराण्यात हे महासंत उदयास आले. मुसलमान धर्माचे संस्थापक महम्मद पैगंबर यांचे नाव त्यांना ठेवण्यात आले. बांधकाम विभागात अधिकारी असणाऱ्या मियांसाब यांचे शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी बांधकामात मोठे योगदान होते. महम्मद अब्दुल्ला सद्‌गुरू अर्थात सद्‌गुरू मियाँसाब यांचा योगी एकादशी दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते. सीताराम महाराज यांचे ते शिष्य असून, सावंतवाडी व कोलगाव येथील स्थानिक व व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा सहभाग असतो. मियाँसाब यांच्या समाधीवर चादर चढवून नवस फेडले जातात. यावर्षी ७९ व्या पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच सद्‌गुरूपूजन, नामस्मरण, कीर्तन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत वाचन, हरिपाठ, आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक येथील भाविकदेखील पुण्यतिथीनिमित्त समाधीवर चादर अर्पण करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी वसंत राणे, सतीश शिरोडकर, दत्तप्रसाद अरविंदेकर, शैलैश पई, उमेश कोरगावकर, बंटी माठेकर, श्री. सावंत, श्री. मसूरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी कोकण महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शवून मियाँसाब समाधीवर फुलांचा हार अर्पण केला.
94398

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com