पदविका अभ्यासक्रमामध्ये
सरस्वती इन्स्टिट्यूटचे यश

पदविका अभ्यासक्रमामध्ये सरस्वती इन्स्टिट्यूटचे यश

Published on

पदविका अभ्यासक्रमामध्ये
सरस्वती इन्स्टिट्यूटचे यश

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३ ः सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल ९० टक्के लागला. कॉलेजमधून प्रथम वर्षात सुरय्या बटवाले (७७.६०) हिने तर द्वितीय वर्षात श्रुती हिरेमठ (८०.५५) हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमांसाठी मे २०२४ साठी झालेल्या परीक्षेत तोंडवली डी. फार्मसी कॉलेजमधून प्रथम वर्षात ३० व द्वितीय वर्षाचे ६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रथम वर्षात द्वितीय क्रमांक आफियाबानू काझी (७५.६०), तृतीय प्रार्थना मोचेमाडकर (७४.५०) हिने मिळविला. द्वितीय वर्षात द्वितीय क्रमांक आदित्य बाद्रे (७७.६४), तृतीय क्रमांक महेश ढवळे (७७.२७) याने मिळविला. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत, प्राचार्य तुकाराम केदार, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. संजय चोथे, प्रा. सुशांत शेटये, प्रा. रेणुका भागवत, प्रा. उर्मिला पाटील, प्रा. सागर मोहिते आदींनी अभिनंदन केले.
94543

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.