भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग १४ जुलैपासून

भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती 
मार्गदर्शन वर्ग १४ जुलैपासून
Published on

भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती
मार्गदर्शन वर्ग १४ जुलैपासून

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. ३ ः येथील भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले आहे. हे मार्गदर्शन वर्ग १४ जुलै पासून दर रविवारी सकाळी नऊ ते बारा दरम्यान जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक तीन येथे घेण्यात येणार आहेत.
मंडळाच्यावतीने गेली चाळीस वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. यंदा तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून गणित, मराठी, बुद्धिमत्ता, इंग्रजी या विषयाचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. मार्गदर्शन वर्ग हे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून असतील. प्रत्येक वर्गात ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ १४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता काशी भवन भक्तनिवास सभागृहात होणार आहे. यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थांच्या कार्यालयात प्रवेश अर्ज उपलब्ध केले आहेत. अधिक माहितीसाठी शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, व्यवस्थापक विजय केळुसकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शैक्षणिक मंडळाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.