मंत्री केसरकर, तेलींकडून थापेबाजी

मंत्री केसरकर, तेलींकडून थापेबाजी

मंत्री केसरकर, तेलींकडून थापेबाजी

रुपेश राऊळ ः मतदारसंघात अनेक समस्या

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः तलाठी, ग्रामसेवक नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. अद्यावत रुग्णालय नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. विजेच्या लपंडाव सुरूच आहे. बीएसएनएल नेटवर्क मिळत नाही, अशा सर्व समस्या असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली हे थापेबाजी करत आहेत. त्यांच्यातील राजकीय भांडण हे जनतेच्या हिताचे नाही, असा टोला ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत लगावला.
येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राऊळ बोलत होते. उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, संघटक मायकल डिसोझा, विनोद ठाकूर, आबा केरकर उपस्थित होते. श्री. राऊळ म्हणाले, ‘‘प्रशासन ठप्प झाले आहे. ग्रामसेवक, तलाठ्यांची अनेक पद रिक्त आहेत. चार चार ग्रामपंचायतीचे पदभार एका तलाठी व ग्रामसेवकाकडे आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, लाभार्थी व महिला अशा सर्वांनाच पंढरीच्या वारीप्रमाणे तलाठी कार्यालयामध्ये खेपा माराव्या लागत आहेत. त्यामुळे ऐन शेतीच्या हंगामात लोकांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. केसरकर व तेली यांनी एकमेकांच्या विरोधात राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जनतेला सुलभ सेवा कशी देता येईल, हे पाहावे. त्यांच्या राजकीय कुरघोडीत जनतेला रस नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘ग्रामसेवक, तलाठी पदे मंजूर आहेत. पण, ती भरलेली नाहीत. लाडकी बहीण योजना आणली. पण, प्रशासन ठप्प झाल्याने लोकांना दाखले मिळत नाहीत. लोकांना वीज, नेटवर्क आणि तलाठी, ग्रामसेवक नसल्याने पंढरीच्या वारी करून ताटकळत राहावे लागत आहे. पाणबुडी मंजूर झाली, त्यावेळी मुख्यमंत्री वेगळे होते आणि आता आर्थिक तरतूद केली त्यावेळी मुख्यमंत्री वेगळे आहेत. केवळ पाणबुडी मंजुरीच्या थापा सुरू आहेत. जनतेवर प्रेम आहे, असे म्हणणारे केसरकर आरोग्य यंत्रणा, प्रशासन, नेटवर्क अशा ठप्प झाले असताना मात्र सुशेगाद आहेत. जनतेच्या प्रेमापोटी कर्तव्याची जाणीव ठेवून आमदार व मंत्री कोणामुळे झाले ही त्यांनी आठवण ठेवली पाहिजे होती. मतदारसंघात अनेक प्रकल्प मंजूर झाले. पण, प्रत्यक्षात किती अवतरले हेही त्यांनी पाहायला हवे. केसरकरांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सुरक्षा रक्षक अशा अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या होत्या. जनतेत नाळ असणाऱ्या नेत्याला पुढील काळात निवडून दिले पाहिजे तरच जनतेचा विकास होणार आहे.
-----------
चौकट
पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य असेल
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे शिवसेनेकडे राहावा म्हणून पक्षप्रमुखांकडे मागणी करणार आहोत. मात्र, महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो मान्य असेल. या मतदारसंघातून यापूर्वी चार वेळा शिवसेना पक्षाचे आमदार विजयी झालेले आहेत, असे श्री. राऊळ यावेळी म्हणाले.
94558

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com