कृषीदूतांकडून 
जानवलीत वृक्षारोपण

कृषीदूतांकडून जानवलीत वृक्षारोपण

Published on

कृषीदूतांकडून
जानवलीत वृक्षारोपण
कणकवली : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीदूत विद्यार्थ्यांनी जानवली गावात वृक्षारोपण केले. कृषीदिनाच्या औचित्‍यावर झालेल्‍या या कार्यक्रमात प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात कृषीदूतांकडून वृक्ष लागवड तसेच शेतीमधील विविध बदल, नवीन प्रयोगांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे,‌ माजी सरपंच.भगवान‌‌ दळवी‌, ग्रामपंचायत सदस्य दामोदर सावंत, तलाठी दत्ता डाके, राजेंद्र राणे‌, विठ्ठल राणे‌,‌ शरद राणे,‌ प्रशांत पोचले‌‌ उपस्थित होते. कृषीदूतांच्यावतीने जानवली ग्रामपंचायत पटांगण, जानवली शाळा क्रमांक १ तसेच विठ्ठल मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कृषीदूत अनिकेत इचके, अविनाश गुरव‌, दिगंबर पाटील‌‌, सिद्धार्थ पाटील‌,‌ तुकाराम माळी, करण चौगुले, हर्ष जाधव‌‌‌‌‌, विराज उगले, सोमा शेखर‌‌,‌‌ विजय कुमार हे विद्यार्थी उपस्थित होते.
----
बाजार बॉईज ग्रुपतर्फे
परुळे येथे वृक्षारोपण
म्हापण ः राज्य कृषी दिनाचे औचित्य साधून आणि पर्यावरणाची गरज ओळखून परुळे येथील येसुआका सड्यावर बाजार बॉईज ग्रुप परुळेबाजारच्या सदस्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी १०० झाडे लावून त्यांच्या संवर्धनाचा संकल्प केला. या मोहिमेत वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, अर्जुन या झाडांची लागवड करण्यात आली. जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा ढासळलेला असमतोल, जमिनीची धूप आणि पाण्याचा वाढता तुटवडा अशा अनेक समस्यांवर वृक्षारोपण हा एकमेव उपाय असून, त्यामुळे पुढील पिढीला या समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमात सृष्टी देसाई या सहा वर्षीय मुलीने सहभाग घेतला. तिच्या उत्साहाचे उपस्थितांनी कौतुक केले. जास्तीत जास्त झाडेलावा व ती जगविण्याचा संकल्प करा, आवाहन बाजार बॉईज ग्रुपच्यावतीने यावेळी करण्यात आले.
----
नागपूर-मडगाव
ॊरेल्वेला मुदतवाढ
खेड : कोकण रेल्वेमार्गावर आठवड्यातून दोनवेळा धावणाऱ्या नागपूर-मडगाव स्पेशलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विदर्भात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी सोयीचे ठरत आहे. प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत असल्याने नागपूर-मडगाव स्पेशलला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. नागपूर-मडगाव स्पेशल बुधवार व शनिवारी तर परतीच्या प्रवासात गुरूवार व रविवारी धावते. ही स्पेशल २९ जूनपर्यंत धावणार होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने स्पेशलच्या सेवा वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यानुसार स्पेशल २८ सप्टेंबरपर्यंत तर परतीच्या प्रवासात २९ सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
------
शैक्षणिक साहित्याचे
विद्यार्थ्यांना वाटप
खेड : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या माध्यमातून तालुक्यातील धनगर समाजातील २६० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तालुक्यातील धामणंद, मिर्ले, खोपी, अस्तान, बिजघर, आंबवली, वडगाव, खवटी या दुर्गम भागातील धनगरवाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. यासाठी मुंबई येथील एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्स फाउंडेशन, मुंबई सेवार्थ फाउंडेशन या संघटनांचे सहकार्य लाभले. एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्स फाउंडेशनचे प्रमुख अनिल झोरे, सेवार्थ फाउंडेशनचे निशांत सानप, परेश हणमशेट, प्रकाश विश्वकर्मा, अस्मिता सामंत यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले. या प्रसंगी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे, अण्णा गोरे, मनोहर ढेबे, नारायण ढाणक आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.