मदर क्विन्स स्कूलचे 
शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मदर क्विन्स स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Published on

मदर क्विन्स स्कूलचे
शिष्यवृत्ती परीक्षेत यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः शिष्यवृत्ती परीक्षा २०२३-२४ मध्ये सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती पटकावत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी) प्रशालेचे १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शहरी सर्वसाधारण गटातून रुणाली चितारी (तालुक्यात सहावी), प्रतीक देसाई (तालुक्यात नववी), अनय दळवी (तालुक्यात बारावी), आराध्या गावडे (तालुक्यात सोळावी), स्वरुप राऊळ (तालुक्यात १९ वी) हे शिष्यवत्तीचे मानकरी ठरले. पूर्व माध्यमिक शिष्यवत्ती परीक्षेत (आठवी) १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये काव्या अपराध (तालुक्यात सोळावी) शिष्यवत्तीची मानकरी ठरली. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रेरणा भोसले, गोविंद प्रभू, फरजाना मुल्ला, योगेश चव्हाण, प्रज्ञा नार्वेकर, प्रणिता मयेकर या शिक्षकांसह मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोसले, विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले व संस्थेचे सदस्य, मुख्याध्यापिका साळगावकर आदींनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.