राष्ट्रवादीतर्फे आज रेनकोट वाटप

राष्ट्रवादीतर्फे आज रेनकोट वाटप

Published on

राष्ट्रवादीतर्फे आज रेनकोट वाटप
साडवली ः खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. ४) सकाळी ११ वा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आशासेविका, गटप्रवर्तक यांना रेनकोट वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सुरेश बने उपस्थित राहणार आहेत. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन दत्ताराम लिंगायत यांनी केले आहे.

शास्त्री हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव
मंडणगड ः तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचच्या वतीने प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उत्तमकुमार जैन, सरपंच मंगेश दळवी, मुख्याध्यापक हुलगे, माजी मुख्याध्यापक अनंत गायकवाड, खोचरे, संस्थेचे चिटणीस अभिजित गांधी उपस्थित होते. विजय कोंडाळकर परिवार यांच्या हस्ते प्रभावती बाबाजी कोंडाळकर यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी सन्मानअंतर्गत रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

समत्व ट्रस्टतर्फे शालेय साहित्य वाटप
साडवली ः समत्व ट्रस्ट व बर्न ॲन्ड मॅकडोनाल्ड कंपनीच्या विद्यमाने संगमेश्वर, चिपळूण व खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गरीब, गरजू व होतकरू मुलांना वर्षभर पुरेल असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कुडवली (नवालेवाडी), कोळंबे, फणसवणे, शृंगारपूर, वाडावेसराड, मलदेवाडी, बौद्धवाडी, बाईतवाडी, कळंबस्ते, कारभाटले, सप्रेवाडी, दळवठणे, उमरे, कापसाळ, तेऱ्ये, घडशीवाडी, तळवठपाळ, पोफळी, अणदेरी, फणसवणे, तांबेडी, अंत्रवली, धामापूर, देवरूख, चवे, निवई, बागवाडी, माखजन आणि देवळे या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये हे वाटप केले. संस्थेचे अध्यक्ष संतोष कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

‘पैसाफंड’ची आरोही शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत
संगमेश्वर ः व्यापारी पैसाफंड संस्था संचालित पैसाफंड इंग्लिश स्कूलची आरोही सावंतने शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. आरोहीच्या यशाबद्दल संस्था आणि प्रशालेतर्फे अभिनंदन करून तिला गौरवण्यात आले. आरोहीची सहावीत असताना नासासाठी निवड झाली होती. नियमित अभ्यास आणि अवांतर वाचनावर भर देत आरोहीने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कठोर परिश्रम घेत अभ्यास केला होता. शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यात ग्रामीण इतरमध्ये तिने यश प्राप्त केले आहे. प्रशालेतर्फे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या उपस्थितीत आरोहीचा सन्मान केला. या वेळी आरोहीची आई दीक्षा सावंत, पर्यवेक्षक दिलीप मोरगे, शिक्षिका पांढरे, डोळस, निमले, शिंदे, कोकाटे आदी उपस्थित होते. आरोहीने प्राप्त केलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.