चिपळूण-महायुती सरकारमुळेच ग्रॅव्हिटी पाणी योजना मार्गी

चिपळूण-महायुती सरकारमुळेच ग्रॅव्हिटी पाणी योजना मार्गी

Published on

94652

महायुतीमुळेच ग्रॅव्हिटी पाणी योजना मार्गी
विजय चितळे : चिपळूण पालिकेच्या इमारतीचाही प्रस्ताव

चिपळूण, ता. ३ ः चिपळूण शहराचा कायापालट होण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन भाजप नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या विकासकामांच्या प्रकल्पांचे आराखडे करण्यात आले. यातील १६० कोटीच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेस तांत्रिक मान्यता मिळाल्याने शहरवासियांना मुबलक शुद्ध पाणी मिळणार आहे. महायुती सरकारमुळे ही योजना मार्गी लागली आहे. त्यामुळे आगामी काळात शहरविकासाची घौडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास भाजपचे माजी नगरसेवक विजय चितळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
चिपळूण शहराच्या १६० कोटीच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेस तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर माजी नगरसेवक विजय चितळे म्हणाले, ही योजना मार्गी लागण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी २०२२-२३ च्या पाणी योजनेच्या आराखड्यात बदल करून नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने सध्या नव्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता दिली आहे. शहरातील भुयारी गटार प्रकल्प, सिमेंट रस्ते, पाणी योजनांचे कोट्यवधीचे आराखडे केल्यानंतर आमच्यावर विरोधकांनी टीका केली होती. आता याच आराखड्यातील कामे मार्गी लागत आहेत. पालिकेची ३० कोटी खर्चाची नवीन इमारतदेखील प्रस्तावित आहे. २००४च्या सुमारास ग्रॅव्हिटी योजनेस ४० ते ६० कोटीचा खर्च होता; मात्र त्या वेळी या योजनेस विरोध करून साडेआठ कोटीची योजना साकारली. पुढे त्या योजनेवर साडेसतरा कोटी खर्च झाले. तत्कालीन आमदारांनी त्याला विरोध केल्याने ग्रॅव्हिटी योजना मागे पडली; मात्र पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर ग्रॅव्हिटी पाणी योजनेला गती मिळाली. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष राम शिंदे, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, माजी नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, श्रद्धा कदम, अश्विनी वरवडेकर, सारिका भावे, रत्नदीप देवळेकर, महेश कांबळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.