रत्नागिरी लायन्स क्लबला २० बक्षिसे

रत्नागिरी लायन्स क्लबला २० बक्षिसे

94621

रत्नागिरी लायन्स क्लबला २० बक्षिसे
रत्नागिरी, ता. ३ : कऱ्हाड येथे झालेल्या सेवा सन्मान या प्रांतीय कार्यक्रमात बेस्ट प्रेसिडेंट शिल्पा पानवलकर, बेस्ट सेक्रेटरी संजय पटवर्धन, बेस्ट ट्रेझरर श्रद्धा कुळकर्णी तर सर्वोत्कृष्ट झोन चेअरमन म्हणून श्रेया केळकर यांना मानाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी लायन्स क्लबने २० बक्षिसांची लयलूट केली.
शिल्पा पानवलकर यांच्या २०२३-२४ या अध्यक्षपदाच्या कालावधीतील कार्यासाठी लायन्स क्लब रत्नागिरीला एकूण ४९ बक्षिसे मिळाली. प्रांतातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला लायन्स क्लब रत्नागिरी परंपरेला साजेसे काम यावर्षी झाले. यामध्ये मल्टिपलला आठ बक्षिसे, डिस्ट्रिक्टमध्ये २० बक्षिसे, रिजनमध्ये पाच तर झोनमध्ये १४ बक्षिसे मिळाली. याबाबत अध्यक्षा पानवलकर म्हणाल्या, हे काम कोणा एकट्याचे नसून हे सर्व श्रेय टीमवर्कचे आहे. त्याचप्रमाणे सर्व लायन सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे यश रत्नागिरी क्लबला मिळाले तसेच सहसचिव म्हणून अस्लम वास्ता व सहखजिनदार मेघना शहा यांचे अनमोल सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com