इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी २९०, आठवीचे ३०६ विद्यार्थी पात्र

इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी २९०, आठवीचे ३०६ विद्यार्थी पात्र

Published on

पाचवीचे २९०, आठवीचे ३०६ शिष्यवृत्तीधारक
रत्नागिरी जिल्ह्याचा झेंडा : ग्रामीण विद्यार्थ्यांनीही दाखविली चमक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या परीक्षांचा अंतिम निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यातील पाचवीतील २९० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, आठवीच्या ३०६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.
पाचवीसाठी जिल्ह्यात ८१७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ८०८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यातील २२२३ पात्र व ५८६० विद्यार्थी अपात्र ठरले. पात्रतेची टक्केवारी २७.५० टक्के असून, २९० जणांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. आठवीतील ५११४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व त्यातील ५०३८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. यातील ९८८ विद्यार्थी पात्र व ४०५० अपात्र ठरले. पात्रतेची टक्केवारी १९.६१ असून, ३०६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
जिल्ह्यात पाचवी राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीसाठी कमाल गुण ९३.२८, किमान गुण ८४ टक्के ग्रामीण सर्वसाधारणसाठी कमाल ८५.९०, किमान ६५.७७, शहरी सर्वसाधारणसाठी कमाल ९१.९४ व किमान ६६.४४ टक्के मिळवणाऱ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. आठवीतील राष्ट्रीय ग्रामीणसाठी कमाल ९५.३०, किमान ७९.१९, ग्रामीण सर्वसाधारणसाठी कमाल ७८, किमान ५६.३७, शहरी सर्वसाधारणसाठी कमाल ८९.३३ व किमान ६०.०० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्‍यांची ‍शिष्यवृत्तीसाठी निवड झाली.


तालुकानिहाय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असे
तालुका पाचवी आठवी
रत्नागिरी ८३ ७२
चिपळूण ३१ ५९
मंडणगड ०४ ०४
खेड ४६ ६१
दापोली १९ १६
गुहागर १२ १८
संगमेश्वर ३९ ३३
लांजा २२ १६
राजापूर ३४ २७


गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची नावे
इयत्ता पाचवी : राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादी - सई पालांडे (नववी, ज्ञानदीप विद्यामंदिर, खेड). राज्यस्तरीय शहरी गुणवत्ता यादी : वेदांत कोकरे (अकरावा, रत्नागिरी पालिका शाळा क्र. १५), पार्थ आग्रे (बारावा, जीजीपीएस, रत्नागिरी). सीबीएसई बोर्ड : अर्णव शिंदे (नववा, पी. एस. बने स्कूल, देवरूख), आयुष जाधव (नववा, पोदार स्कूल, रत्नागिरी). राष्ट्रीय ग्रामीण यादी : सई पालांडे (नववी, ज्ञानदीप), अर्णव बंडगर, सार्थक घुगे. जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण यादी : श्रुतिका पाटील, राज देशमुख, गार्गी घडशी. शहरी सर्वसाधारण : वेदांत कोकरे, पार्थ आग्रे, आयुष चव्हाण.

इयत्ता आठवी : ग्रामीण विभाग गुणवत्ता यादी : अनुराग वाघमोडे (प्रथम), दिशा मोहिते (द्वितीय), आर्यन भगत (सातवा), दिव्यांक मुंडे (दहावा), आर्या बेंद्रे (सव्वीसावी, सर्व विद्यार्थी ज्ञानदीप विद्यामंदिर, खेड). शहरी विभाग राज्यस्तरीय गुणवत्ता यादी : आदित्य बनगर (अठरावा, फाटक हायस्कूल, रत्नागिरी). सीबीएसई अभ्यासक्रम समृद्धी घाडगे (बारावी), आराध्या आपटे (तेरावी), धनोज पाटील (चौदावा), ज्ञानेश्वरी नरुटे (पंधरावी), श्रेयस चांदिवडे (पंधरावा, सर्व विद्यार्थी ज्ञानदीप विद्यामंदिर, खेड).


तालुका इयत्ता ५ वी टक्केवारी इयत्ता ८ वी टक्केवारी
चिपळूण ३६३ २९.९५ २३७ २६.१६
दापोली २३५ २३.९६ ९३ १२.६९
गुहागर १२२ १८.२९ ३७ ९.८१
खेड २८६ २९.३९ १६४ २३.६७
लांजा १४२ २४.०३ ३३ १३.५८
मंडणगड ३८ ११.८८ १२ ५.७४
राजापूर १९८ २६.८७ ६७ १६.५०
रत्नागिरी ६०१ ३६.८१ २४२ २४.४०
संगमेश्वर २३८ २५.५१ १०३ २१.५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.