डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक 
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Published on

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ : राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता सहावी आणि नववी मधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि मराठी माध्यमातून लेखी, प्रात्‍यक्षिक, प्रकल्‍प आणि मुलाखत या चार टप्प्यांत ही परीक्षा होणार आहे.
परीक्षा बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे १९८१ सालापासून डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा घेतली जात. यात देशभरातील ३ हजार पेक्षा जास्त शाळांतील विद्यार्थी सहभागी होतात. या परीक्षेचे चारही टप्पे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य, कास्य पदक आणि शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक मधील या परीक्षेसाठी शाळेमार्फत ३१ जुलै पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर वैयक्तिक ऑनलाईन अर्ज १ ते ३१ ऑगस्ट या दरम्‍यान स्वीकारले जाणार आहे. शंभर गुणांची लेखी परीक्षा नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी होणार आहे. लेखी परीक्षेतून गुणवत्तेनुसार साडेसात टक्के विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवडण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता सहावीसाठी ५ जानेवारी २०२५ आणि नववीसाठी १९ जानेवारी २०२५ रोजी विभागवार केंद्रावर होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेतून दहा टक्के विद्यार्थी प्रकल्प व मुलाखतीसाठी निवडण्यात येतील. प्रकल्प मुलाखत १६ मार्च २०२५ रोजी मुंबई येथे होईल. इयत्ता सहावी व नववीतील इच्छुक विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत या परीक्षेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा समन्वयक सौ. सुषमा केणी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.msta.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.