सरपंचपदाचे स्वप्न भंग 
झाल्याने कोदे वैफल्यग्रस्त

सरपंचपदाचे स्वप्न भंग झाल्याने कोदे वैफल्यग्रस्त

Published on

94745

सरपंचपदाचे स्वप्नच भंग
झाल्याने कोदे वैफल्यग्रस्त

रणजित परब ः टीकेला पत्रकातून उत्तर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : गेली बरीच वर्षे सरपंचपदाचे असलेले स्वप्न पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य विहीर कोदे हे वैफल्यग्रस्त बनले आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्यावर खोडसाळ आरोप केले आहेत, अशी टीका कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रणजित परब यांनी पत्रकातून केली आहे.
दरम्यान, गावचे प्रथम नागरिक असलेल्या सरपंचांना एकेरी भाषेत बोलणे हे सुसंस्कृत घराण्यातील कोदे यांना शोभत नाही. त्यांच्या या बोलण्यावरून त्यांच्यावर काय संस्कार झाले हे दिसते, असेही श्री. परब यांनी म्हटले आहे.
कांदळगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर पहिल्याच दिवशी कोसळले. या छप्पराची दुरुस्ती हाोण्यासाठी ग्रामपंचायतीने गतवर्षी मार्चमध्ये पत्राद्वारे गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते; मात्र प्रशासनाकडून त्याची कार्यवाही झालेली नाही. छप्पर दुरुस्तीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याचा आरोप श्री. परब यांनी केला होता. यावर भाजपचे ग्रामपंचायत सदस्य कोदे यांनी सरपंच हे अकार्यक्षम असल्याचा, तसेच अन्य आरोप केले होते. यावर श्री. परब यांनी पत्रकातून त्यांना उत्तर दिले.
पत्रकात म्हटले आहे की, मागील कार्यकाळात मी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून गावातील जनतेने निवडून दिले. त्यामुळे कार्यक्षम, अकार्यक्षम हे ठरविण्याचा अधिकार कोदे यांना नाहीत, ते त्यांना जनतेने २०१७, २०२२ मध्ये दाखवून दिले आहे. त्यांची २०१७ मध्ये पक्षाने केलेली हकालपट्टी सर्व कांदळगाववासीयांना माहीत आहे आणि त्याचवेळी त्यांना जनतेने त्यांची कार्यक्षमता दाखवून दिली आहे. पक्षश्रेष्ठींनी २०२२ मध्ये नाकारलेल्या उमेदवारीवरून त्यांना त्यांच्या पक्षात किती किंमत आहे, हे दिसते. आतापर्यंतच्या कांदळगावच्या इतिहासात सरपंचांचा राजीनामा मागणे, त्यांना मानसिक त्रास देणे याचा ठेका कोदे यांनी घेतला आहे. कांदळगावात एकही विकासकाम आणले नाही, मग दलाली किंवा कमिशन मी तुमच्या घरी येऊन घेतले का? असा प्रश्न श्री. परब यांनी कोदे यांना केला. ज्या वॉर्डचे भाजपचे जे अन्य ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते सदस्य त्या वॉर्डमधील शाळेच्या कामासाठी निधी आणण्यास असमर्थ ठरले, अशी टीकाही श्री. परब यांनी केली. कोदे यांचे घराणे सुसंस्कृत असूनही गावच्या प्रथम नागरिकास एकेरी शब्दांत उल्लेख केल्याने त्यांच्यावर काय संस्कार झालेत, हे त्यांनी आपल्या बोलण्यातून सर्वसामान्य जनतेला दाखवून दिले आहे. सरपंचपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या शाळेच्या आवारात इमारतीस धोकादायक असलेली झाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तोडून घेतली, त्यावेळी कोदे कुठे होते, असा प्रश्नही श्री. परब यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.