मधमाशा पालनासाठी 
अनुदानासह प्रशिक्षण

मधमाशा पालनासाठी अनुदानासह प्रशिक्षण

Published on

मधमाशा पालनासाठी
अनुदानासह प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत २०१९ पासून मध केंद्र योजना (मधुमक्षिका पालन) संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा अधिक प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लाभार्थींना ५० टक्के अनुदान व मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे.
जिल्ह्यातील मधपाळ, शेतकरी, जंगल भागात राहणारे बेरोजगार युवक, महिला बचतगट, शेतकरी गट, वनविभागाकडील गट, कंपन्या, संस्था सोसायट्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी. डी. कुरुंदवडे यांनी केले आहे. लाभार्थींनी ५० टक्के स्वगुंतवणूक भरल्यानंतर मधपाळांना स्थानिक ठिकाणी दहा दिवसांचे तर केंद्रचालकांना महाबळेश्वर येथे वीस दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मधपाळांनी उत्पादित केलेला मध हा शासनाच्या हमी भावाने खरेदी केला जाणार आहे. याशिवाय शाळा, कॉलेज, निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी विशेष तथा छंद प्रशिक्षणाची सोय केली आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग (कुडाळ पंचायत समितीजवळ, कुडाळ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.