रत्नागिरी- विकासनिधीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे

रत्नागिरी- विकासनिधीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे

Published on

94754

विकासनिधीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे
भाजपच्या माजी नगरसेवकांनी घेतली भेट; विकासकामांबाबच चर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांनी ही भेट घडवून आणली. त्या भेटीमुळे खूप आनंद झाल्याचे राजू तोडणकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी मंजूर केलेली रत्नागिरीची नळपाणी योजना सुरळीत सुरू झाली नसल्याबद्दल व रत्नागिरीच्या विकासासाठी वाढीव निधी मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या निमित्त रत्नागिरीतील भाजपचे नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रत्नागिरी शहरासाठी विकासनिधीची विनंती केली. रत्नागिरी शहराच्या विकासाकरिता विविध विषयांवर चर्चादेखील केली. लोकसभा मतदार संघात भाजपचे खासदार नारायण राणे आणि कोकण पदवीधर मतदार संघात आमदार निरंजन डावखरे यांनी हॅट्ट्रिक करत यश मिळवल्याने या निवडणुकीमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांच्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले.
मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत त्यांच्या शासकीय बंगल्यावर राजू तोडणकर व सहकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांच्या समवेत विविध विकासात्मक विषयांवर चर्चा झाली. नवनिर्वाचित आमदार डावखरे यांच्या समवेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या दालनात भेट झाली. पालकमंत्री सामंत यांच्याकडेही प्रभागातील विकासकामांबाबात मागण्या मांडल्या, असे तोडणकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.