बुटालामध्ये कृषिदिन साजरा

बुटालामध्ये कृषिदिन साजरा

डिंगणी खाडेवाडी
शाळेत शिक्षण परिषद
संगमेश्वर ः तालुक्यातील डिंगणी खाडेवाडी शाळेत शिक्षकांची शिक्षण परिषद झाली. शिक्षण परिषदेचे अध्यक्षपद केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांनी भूषवले. विद्याप्रवेश कृतिपुस्तिका, अध्ययनस्तर निश्चिती, प्रशासकीय विभाग शालेय ऑनलाईन कामकाज आदी विषयांवर तज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. आनंददायी शनिवार हा जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम असून, विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून आठवड्यातील पाच दिवसांच्या अध्ययनानंतर एक दिवस दप्तरविरहित ठेवण्याबाबत शासनाचा असलेला दृष्टिकोन व त्यातील शिक्षकांची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. केंद्र मुख्याध्यापक श्रीमती मनवे, खाडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक मनवे, पिरंदवणे नं. १ शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
-------------
बुटालामध्ये
कृषिदिन साजरा
गावतळे : दापोली तालुक्यातील श्रीमान मथुराभाई बुटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गावतळेत कृषिदिन साजरा करण्यात आला. या वेळी एन. एल. कालेकर यांनी कृषिदिनाचे महत्व सांगितले. वृक्षसंवर्धन व वृक्षांचे घटते प्रमाण याचे मार्गदर्शन केले. कृषीचे देशाचे अर्थकारणातील महत्व समजून सांगितले. पंचक्रोशी स्कूल कमिटी अध्यक्ष एन. वाय. पवार, सरपंच विधी पवार, राजाराम रसाळ, दीपक देवरूखकर यांच्या हस्ते शालेय परिसरात सुपारीचे आणि इतर वृक्षारोपण करण्यात आले. प्रभारी प्राचार्य बाळासाहेब कुचणुरे, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
----------
94706

जाकादेवी विद्यालयाचे
तिघेजण गुणवत्ता यादीत
रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यामध्ये आराध्य हेमंत उरूणकर तालुक्यात दुसरा तर जिल्ह्यात २८वा आला आहे‌. चिंतन दिगंबर घवाळी तालुक्यात १०वा तर जिल्ह्यात ७७वा आला आहे. ‌सोहम माधव बोरकर तालुक्यात १७वा तर जिल्ह्यात ११०वा आला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील ज्येष्ठ शिक्षक केशव राठोड, सायली राजवाडकर, प्राची पवार, मंदार रसाळ यांनी मार्गदर्शन केले.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com