बांदा केंद्रशाळेचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत चमकले

बांदा केंद्रशाळेचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत चमकले

94798

बांदा केंद्रशाळेचे पाच विद्यार्थी
शिष्यवृत्ती परिक्षेत चमकले
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पीएम श्री जिल्हा परिषद बांदा क्रमांक १ केंद्र शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीधारक बनण्याचा मान मिळविला आहे. विद्यार्थ्यांनी अनेक वर्षांची शाळेच्या शिष्यवृत्तीत परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी यासाठी परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने ही परीक्षा राज्यभर घेण्यात येते. या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षे रक्कम स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा केंद्र शाळेतील सर्वेक्षा ढेकळे ही तिसरी, राजेश्वरी गवस अठरावी, श्रेयस बुवा विसावा, आयुष बांदेकर सदतीसावा, निल बांदेकर छप्पन्नावा क्रमांक या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, मुख्याध्यापक शांताराम असनकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, स्नेहा घाडी, रसिका मालवणकर, जे. डी. पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, जागृती धुरी, कृपा कांबळे, विनिता गोसावी, आश्लेषा कांबळे, मनिषा काळे, मृणाल परब, केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत, लक्ष्मीकांत ठाकूर, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संदीप गवस, म. ल. देसाई, गटसमन्वयक प्रमोद पावसकर, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com