कट्टा येथे बुधवारी
शोकसभेचे आयोजन

कट्टा येथे बुधवारी शोकसभेचे आयोजन

Published on

कट्टा येथे बुधवारी
शोकसभेचे आयोजन
मालवण : कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय नाईक यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी (ता. १०) दुपारी ३ वाजता कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या सिद्धिविनायक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा व वराडकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा डॉ. दादासाहेब कला वाणिज्य महाविद्यालय कट्टा, वराडकर हायस्कूल आजी-माजी विद्यार्थी, तसेच संजय नाईक मित्रपरिवार यांनी ही शोकसभा आयोजित केली आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सेवानिवृत्त सेवक संघाची
मालवणात रविवारी सभा
मालवण : तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवारी (ता. ७) सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मंगेश शेर्लेकर, सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

मालवणात उद्या
सहविचार सभा
मालवण ः तालुक्यातील सर्व ''व्हीएलई'' म्हणजेच महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र, ग्रामपंचायतीचे सीएससीआयडी होल्डरच्या सर्व चालक-मालकांची सहविचार सभा शनिवारी (ता. ६) सकाळी १०.३० वाजा अथर्व मंगल कार्यालय कुंभारमाठ-मालवण येथे आयोजित केली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. शासनाच्या विविध उपक्रमात सक्षमपणे काम होण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वांच्या कामात एकसूत्रता आणण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी उहापोह करण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील खरात यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.