माजी पोलिस उपनिरीक्षक बाबू तेली यांचे निधन

माजी पोलिस उपनिरीक्षक 
बाबू तेली यांचे निधन
Published on

माजी पोलिस उपनिरीक्षक
बाबू तेली यांचे निधन
सावंतवाडी, ता. ४ : निवृत्त पोलिस उपनिरीक्षक बाबू तेली (वय ६२) यांचे आज सकाळी ओरोस येथील निवासस्थानी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. मेमध्ये ते सावंतवाडी पोलिस ठाण्यातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून ते निवृत्त झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना असा परिवार आहे.
94848
----
विलास हडपी यांचे निधन
आचरा, ता. ४ ः श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदरचे सेल्समन, चिंदर ग्रामपंचायत माजी सदस्य विलास उर्फ बाबा हडपी (वय ६८) यांचे आज सकाळी निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चिंदर येथील रेशन दुकानात त्यांनी सेल्समन म्हणून २५ वर्षांहून अधिक काळ सेवा केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजया, पुतण्या, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भगवती उत्साही मंडळ चिंदर-भटवाडी मंडळाचे भजनी बुवा म्हणून त्यांनी अनेक वर्षे सेवा केली होती. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते संजय हडपी यांचे ते बंधू होत.
94843

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.