लेईशा पराडकर शिष्यवृत्तीत मालवण तालुक्यामध्ये प्रथम

लेईशा पराडकर शिष्यवृत्तीत मालवण तालुक्यामध्ये प्रथम

Published on

94851

लेईशा पराडकर शिष्यवृत्तीत
मालवण तालुक्यामध्ये प्रथम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी) मालवण-रेवतळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी लेईशा पराडकर हिने तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळविला आहे. या परीक्षेसाठी तिला श्रीमती देशमुख, श्री. गोगटे, मनाली वेंगुर्लेकर व पालकांचे मार्गदर्शन लाभले. लेईशा हिने यापूर्वी वक्तृत्व, निबंध तसेच क्रीडा स्पर्धांतही यश मिळविले आहे. लेईशा ही चौके-मांडखोल जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक नारायण पराडकर व मालवण पंचायत समितीमधील ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक वर्षा पराडकर यांची ती कन्या आहे. गटविकास अधिकारी आत्मज मोरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौघुले यांनी पेढा भरवून व भेटवस्तू देऊन तिचे अभिनंदन केले. यावेळी प्राथमिक शिक्षक बंडू राठोड तसेच पराडकर कुटुंबीय उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.