निकृष्ट रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

निकृष्ट रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

Published on

rat५p२.jpg-
२४M९४८८४
रत्नागिरी- शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची तत्काळ दुरूस्ती करण्यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
---------

‘त्या’ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

‘मनसे’चे मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी ; निकृष्ट रस्ते दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : पाऊस पडल्यानंतर पहिल्या पंधरवड्यातच दोन महिन्यांपूर्वी केलेला रस्त्याच्या डांबरीकरणाची दुरवस्था झाली. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत हे माहित असूनही अशा चुका होत असतील तर हे दुर्दैव आहे. मुख्याधिकाऱ्यांचा कोणताच धाक राहिलेला नाही. निकृष्ट रस्ते करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि तत्काळ रस्ते दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत रत्नागिरी मनसे पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, शाखाध्यक्ष मार्विक नारकर, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतीश खामकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे आदी पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ओरड झाल्यानंतर काँक्रिटीकरण करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे सुरवातीला डांबरीकरण करण्यात आले. दोन ते तीन महिन्यांपूर्वीच हे डांबरीकरण झाले. पहिल्या पावसातच हे डांबरीकरण वाहून जाऊन रस्त्यांची चाळण झाली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. जनतेचा पैसा काही लोकं वाया घालवत आहेत. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारीही येत आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली. तसचे खराब रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. गॅस पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ही तत्काळ होत नाही. पाऊस पडल्यावर सर्व माती रस्त्यावर येऊन नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासालाही मनसे पदाधिकाऱ्यांनी आज वाचा फोडली.
--------------

पंधरा जुलैची डेडलाईन

रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात आले. लवकरात लवकर हे खड्डे कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाने दुरुस्त करण्यात यावेत अन्यथा येत्या १५ जुलैला रस्त्यांवर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.