- ...तर गोमातेच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ

- ...तर गोमातेच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ

rat५p४.jpg-
२४M९४८९६
नीलेश राणे
---------

...तर गोमातेच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ

माजी खासदार नीलेश राणे ः प्रशासनाला १० दिवसाची डेडलाईन

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. ५ : एका गाडीतून गोमांसाचे अवशेष रस्त्यावर पडतात. मनाला अतिशय वेदना देणारा हा कालचा प्रकार आहे. हा विषय लावून धरणाऱ्या गोसेवकांचे मनापासून कौतुक करतो; पण आज विनंती करतो परत करणार नाही. १० दिवसात हे प्रकार थांबले नाही तर आम्ही थांबवून गाड्या फोडणार. गोमातेसाठी अंगावर गुन्हे घेऊ. प्रशासनाला शेवटचं सांगतो, हे थांबले नाही तर कायदा हातात घेणार, असा थेट इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला. रत्नागिरीनजीक मिरजोळे एमआयडीसी येथे काल रात्री गोमांसाचे अवशेष रस्त्यावर पडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे आक्रमक झाले.


एमआयडीसीतील प्लॉट क्र. ४४ वर गुरूवारी रात्री गोमांसाचे अवशेष रस्त्यावर पडलेले दिसून आले. त्यानंतर रत्नागिरीतील नागरिक आक्रमक झाले. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि हे प्रकार तत्काळ बंद झाले पाहिजेत, अशी मागणी करत शुक्रवारी पहाटेपर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात हजारो रत्नागिरीकर एकत्र आले होते. या सगळ्या प्रकारची दखल आता भाजप नेते माजी खासदार राणे यांनीही घेतली आहे. याबाबतची प्रतिक्रिया देणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला.
राणे म्हणाले, मिरजोळेतील हा प्रकार मनाला वेदना देणार आहे. रत्नागिरीमध्ये हे प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहेत. हे सगळं जर प्रशासनाला माहिती आहे तर त्यावर कारवाई का होत नाही? पोलिसांना सर्व मार्ग माहिती आहेत. हे प्रकार कोण करतं हेही माहिती आहे. मग इतके दिवस हे प्रकार थांबवले का जात नाहीत? त्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. जर दहा दिवसात हे प्रकार थांबवले नाहीत तर गाड्या आम्ही थांबवणार, त्या फोडणार आणि जिथे ही कत्तल चालते ते स्पॉट आम्ही उद्ध्वस्त करणार. पोलिसांनी तत्काळ कडक कारवाई केली नाही तर गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही कायदा हातात घेणार, असा थेट इशारा राणे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com