अर्थसंकल्पातील योजना तळागाळापर्यंत पोहचवू

अर्थसंकल्पातील योजना तळागाळापर्यंत पोहचवू

Published on

अर्थसंकल्पातील योजना तळागाळापर्यंत पोहचवू

सदानंद चव्हाण ः माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी नियोजन

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः महायुती सरकारने सादर केलेला पुरवणी अर्थसंकल्पातील सर्व योजना तळागाळात पोहचवण्यासाठी व लाभार्थींना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
माजी आमदार चव्हाण म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन वर्षात या सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. विशेषतः एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत या योजनेचा लाभ महिलांना झाला. शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सरकारने निर्णय घेतलेले आहेत; परंतु या वेळचा अतिरिक्त अर्थसंकल्प तर सर्वोत्तम आहे. अर्थसंकल्पात वारकरी बांधवांसाठी प्रतिदिंडी २० हजार रुपये दिले जाणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली असून, या योजनेमुळे फक्त महिलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला हातभार लागणार आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना महिना १५०० रुपये मिळणार आहेत. ही योजना चिपळूण तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेना काम करणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्याशिवाय महिलांना पिंक ई-रिक्षा, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ३ सिलेंडर मोफत, महिला लघुउद्योगअंतर्गत १५ लाख कर्जापर्यंत व्याज परतावा, लखपती दीदी योजना या योजना महिलांना सक्षम करण्याच्यादृष्टीने महत्वाच्या ठरणार आहेत तसेच युवकांना कार्यप्रशिक्षण, प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण व दरमहा १० हजार, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, महारोजगार मेळाव्यातून ९५ हजार ४७८ नोकऱ्या, या योजनेचा युवकांना मोठा फायदा मिळणार आहे.

शेतकरी हा केंद्रबिंदू
शेतकरी हाच मुख्य केंद्रबिंदू मानून महायुती सरकारने मुख्यमंत्री बळीराजा योजना आणली असून, त्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज तर शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ चिपळूण विधानसभा मतदार संघातील लोकांना करून दिला जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.