सुर्वे खांडेकरांची शिक्षक समिती जिल्हा प्रतिनिधीपदी निवड

सुर्वे खांडेकरांची शिक्षक समिती जिल्हा प्रतिनिधीपदी निवड

शिक्षक समितीच्या प्रतिनिधीपदी
संजय सुर्वे, श्रीकृष्ण खांडेकर

खेड ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडची सभा नुकतीच खेड शाळा नं. १ मध्ये झाली. तालुकाध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ती झाली. या सभेमध्ये रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून संजय सुर्वे व श्रीकृष्ण खांडेकर यांची निवड करण्यात आली. ते शिक्षक पतपेढीचे माजी संचालक असून त्यांनी खेड शिक्षक समितीचे सरचिटणीस पदही भूषवले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता म्हणून सुर्वे यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झालेले खांडेकर हे शिक्षक समितीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या आंबवली विभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आंबवली शाळेचे मुख्याध्यापक असून खो-खोचे राष्ट्रीय पंच म्हणून जिल्हाभरात ख्याती आहे. त्याचप्रमाणे संघटनेसाठी सतत झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
----------

चंदुलालशेठ हायस्कूलमध्ये
शैक्षणिक साहित्याचे वाटप

खेड ः श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खेड या प्रशालेमध्ये १०वीमधील प्रथम ५ आलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या माध्यमातून मुलांना मोफत दप्तर व शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी सेवा सहयोग संस्था सदस्य सुयोग बेडेकर, प्रशाला समितेचे चेअरमन राजेश बुटाला, बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकज शहा, सदस्य संजय बुटाला, अजित बुटाला, प्रशालेचे मुख्याध्यापक रोहित भोळे, प्रायमरी मुख्याध्यापक चव्हाण, पर्यवेक्षक कांबळे, प्रायमरी अॅडमिन नाईक, उच्च माध्यमिक शिक्षक पाटील, शिक्षिका लोखंडे, शिक्षक धोत्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
--

मांडकी-पालवणमध्ये
महाराष्ट्र कृषिदिन साजरा

चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणमध्ये महाराष्ट्र कृषिदिन साजरा करण्यात आला. या वेळी राज्यातील कृषिक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तृतीय वर्षातील प्रज्ञा गोठणकर व द्वितीय वर्षातील शीतल डोहाळे या विद्यार्थ्यांनी कृषिदिनाविषयी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक मोहिरे यांनी विद्यार्थ्यांना कृषिदिन का साजरा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या शमिका चोरगे यांनी कृषिदिन साजरा करण्याचे महत्व पटवून दिले. महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
---------

खासगी बसला
प्रवाशांची पसंती

चिपळूण : खेड-चिपळूण मार्गावर उशिराने धावणाऱ्या तसेच आसनांचा अभाव असणाऱ्या एसटी बसेसमुळे आधीच प्रवासी मेटाकुटीस आले आहेत. त्यात आता गळक्या एसटी बसेसमुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. यामुळे प्रवासी आता खासगी आरामबस सेवेकडे वळत आहेत. एकीकडे भररस्त्यात बंद पडणाऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. खेड-चिपळूण बसेसमधून अक्षरश: कारंज्यासारखे पाणी प्रवाशांवर उडत असते. यामुळे आसने असूनही प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे. यामध्ये सुधारणा करण्याच्यादृष्टीने कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याने प्रवाशांना फटका बसत आहे. यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत.
------

जनता शिक्षणसंस्थेची पालकसभा
चिपळूण : खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षणसंस्था धामणंद संचलित यशवंत विद्यालय धामणंद या शाळेत नुकतीच शिक्षक-पालक सभा मुख्याध्यापक सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपस्थित पालकवर्गाचे, सर्व समिती सदस्य यांचे स्वागत करण्यात आले. शालेय शिस्त व कार्यवाही, शालेय उप्रक्रम, स्पर्धा परीक्षेचे नियोजन, वृक्षदिंडी, वृक्षारोपण, वर्षा सहलचे आयोजन, शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मोफत पास, दत्तक पाल्य योजना आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी अभ्यासिका, चर्चासत्र आयोजित करण्यात यावेत, असे ठरवण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती, परिवहन समिती, शिक्षक-पालक संघ, मातापालक संघ, अशा विविध समिती स्थापन करण्यात आल्या. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा म्हणून अनिशा म्हापदी यांची निवड करण्यात आली. या वेळी वैभव पालांडे, प्रदीप थोरे, सुनील जंगम, नम्रता सुतार, श्रद्धा सावंत. अनिशा म्हापदी आणि पालक वर्ग उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com