कनेडी शिक्षण संस्था गुणवत्तेत पुढे

कनेडी शिक्षण संस्था गुणवत्तेत पुढे

Published on

कनेडी शिक्षण संस्था गुणवत्तेत पुढे

सतीश सावंत ः आज वर्धापन दिनी विविध उपक्रम

कणकवली, ता. ६ ः पर्यावरण पूरक, कौशल्य विकास साधणारे आणि सर्वांगीण विकासचे परिपूर्ण शिक्षण सातत्याने देत असताना गुणवत्तापूर्व निकाल लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर या विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेच्या प्रांगणात ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे ७० व्या वर्षांत पदार्पण होताना नव्याने कौशल्य विकासपूर्ण अभ्यासक्रम सुरू करत आहोत. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संस्थेच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नव्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उद्‍घाटन होणार असून रविवारी (ता. ७) जुलैला सकाळी दहा वाजता संस्थेचा वर्धापन साजरा होत आहे, अशी माहिती श्री. सावंत यांनी दिली. माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आज आयोजित संस्थेच्या पत्रकार परिषदेला संस्था अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह शालेय समितीचे चेअरमन आर. एच. सावंत, संस्थेचे सनदी लेखापाल तुकाराम रासम, अंतर्गत हिशेब तपासणी रवींद्र सावंत, शालेय समितीचे सदस्य बावतीस घोन्साल्विस, प्राचार्य सुमंत दळवी आदी उपस्थित होते.
संस्थेची स्थापना ४ जुलै १९५४ रोजी झाली. गेल्या काही वर्षांत संस्थेने विविध उपक्रम सुरू केले. उपक्रम शासनाच्या विविध निकषांमध्ये बसत असल्यामुळे मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाचे सर्व निकष पूर्ण केले. त्यामुळे तालुकास्तरावर ३ लाख आणि जिल्हास्तरावर ११ लाखांचे पारितोषिक संस्थेला मिळाले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना अद्ययावत लॅब उभारली आहे. विद्यार्थी बँक उपक्रम सुरू आहे. २००४ मध्ये विज्ञान शाखा सुरू केल्याने अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियांत्रिकी, नर्सिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये जाऊन यश मिळवत आहेत. विविध क्रीडा क्षेत्रांमध्येही सांघिक काम शिक्षकांनी केले आहे. ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोवा विभागामध्ये एका विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कमवा आणि शिका उपक्रम सुरू आहे. यासाठी अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या मुलींसाठी शिवणकला हा विषय असून सहा शिलाई मशीन उपलब्ध आहेत.
95201

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.