मडुरा, पाडलोसवासीय तलाठ्याविना हैराण

मडुरा, पाडलोसवासीय तलाठ्याविना हैराण

94995

मडुरा, पाडलोसवासीय तलाठ्याविना हैराण
स्वतंत्र सजाची मागणीः उपसरपंच गावडेंनी वेधले तहसीलदारांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः मडुरा व पाडलोस गावातील शेतकऱ्यांना कर्जाची उचल करताना आठ ‘अ’ किंवा सातबारा मिळण्यासाठी अनेक दिवस तलाठ्याची वाट पहावी लागते. सद्यस्थितीत सातार्डा तलाठी यांच्याकडे मडुऱ्याचा चार्ज आहे. त्यामुळे ते केवळ दोन दिवस उपलब्ध असतात. अन्य दिवशी शेतकरी, विद्यार्थी यांना तलाठ्याविना कागदपत्रांसाठी खेपा माराव्या लागतात. त्यामुळे मडुरा सजासाठी स्वतंत्र तलाठी द्यावा, अशी मागणी मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.
मडुरा सजा तलाठी कार्यालयांतर्गत मडुरा व पाडलोस ही दोन गावे येतात. शेकडो शेतकरी मडुरा व पाडलोस विकास सोसायटीमधून कर्जाची उचल करतात. यासाठी सातबारा व आठची आवश्यकता आहे. परंतु, कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होते. दोन तीन किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या शेतकऱ्यांना तलाठी नसल्याने त्या दिवसाची वाट पहावी लागते. त्यामुळे मडुऱ्यासाठी स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी मडुरा उपसरपंचगावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, मडुरा येथे बांधण्यात आलेल्या नविन तलाठी कार्यालयाबाबत अनेक त्रुटी असून प्रत्यक्षात पाहणी केल्याशिवाय त्यास परवानगी देऊ नये, असे श्री. गावडे यांनी तहसीलदार पाटील यांना सांगितले. तसेच पुलाचे बांधकाम करताना गावातील तीन वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येणारी पाईपलाईनचे नुकसान केले व अद्यापपर्यंत ती दुरुस्ती केली नसल्याबाबत तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. तहसीलदार पाटील यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दाखवल्याचे उपसरपंच गावडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com