-लाडकी बहिणीचे चार लाख लाभार्थी

-लाडकी बहिणीचे चार लाख लाभार्थी

‘लाडकी बहीण’चे ४ लाख संभाव्य लाभार्थी

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह ः महिन्यात अर्जाची पूर्तता करण्याचे उद्दीष्ट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटात जिल्ह्यात ४ लाखाहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी होऊ शकणार आहेत. या संभाव्य लाभार्थी महिलांचे अर्ज प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सिंह म्हणाले, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या असल्याने, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील १८ वयाच्या पुढील महिला मतदारांची संख्या ५ लाख ४६ हजार १७२ आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटाच्या महिलांची संख्या सुमारे ४ लाख ७ हजार ५१ इतकी आहे. ही संख्या संभाव्य महिला लाभार्थ्यांची असल्याचे जिल्हाधिकाऱ्‍यांनी सांगितले. यामध्ये दापोली-खेड-मंडणगड मध्ये सुमारे १ लाख १७ हजार ९१७, गुहागर चिपळूण-खेडमध्ये १ लाख १ हजार २३, चिपळूण-संगमेश्वरमध्ये १ लाख १२ हजार ८६, रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये १ लाख १९ हजार ६८७ तर राजापूर-लांजा-साखरपामध्ये ९५ हजार ३५९ संभाव्य महिला लाभार्थी असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत महिला लाभार्थ्यांबाबत अंगणवाडी, आशा, एनआरएचएम विभागाकडूनही माहिती घेतली जात आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून २३६ ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत तर ३ हजार ५८५ ऑफलाईन अर्ज महिलांनी जमा केले आहेत. पालकमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे ठिकठिकाणी शिबिरेही आयोजित केली जात आहेत.
रत्नागिरीसाठी वीर सावरकर नाट्यगृहामध्ये अर्ज भरुन घेण्यासाठी शनिवार ६ जुलैला विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते सुरु राहणार आहे. याठिकाणी पाच हजार अर्जही वितरणासाठी ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी १० टेबल लावण्यात येणार असून लाडकी बहिणसह रेशनकार्ड व अन्य दाखल्यांचे वितरणही केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्‍यांनी सांगितले. याचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. अशाच प्रकारचा उपक्रम रविवारी लांजा व राजापूरमध्ये तर सोमवारी चिपळूणमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com