केबल टाकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा

केबल टाकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा

Published on

95058

केबल टाकणाऱ्या कंपनीवर
फौजदारी गुन्हा दाखल करा
सुरेश भोगटेः खोदकामावेळी पाईपलाईन फुटल्या
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः शहरात भूमिगत वाहिन्या घालण्याचे काम चालू असल्याने अनेक भागात पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत. त्यामुळे नळधारकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे केबल टाकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी पालिकेकडे केली आहे. पालिकेला विश्वासात न घेता सुरु असलेले केबलचे काम शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याने ते तात्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली.
श्री. भोगटे यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरवासीयांसाठी असलेली पाण्याची लाईन ही पूर्वीपासून भूमिगत आहे. सध्या भूमिगत खुदाई करून केबल टाकण्याचे काम चालू आहे, त्याबाबत पालिकेला कोणतीही कल्पना नाही. सार्वजनिक बांधकामकडून परवानगी घेऊन खुदाई करून पाईप टाकण्याचे काम चालू आहे. शहरांमध्ये खुदाई करत असताना संबंधित कंपनीकडून अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे नागरिकांना चार-चार दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. शहरातील दत्तनगर परिसरामध्ये शेकडो घरांना गेले चार दिवस पाणी मिळाले नसून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडून सुरू असलेले हे काम तात्काळ थांबून नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.