सव्वा तीन हजार उमेदवार ''कौशल्य''साठी पात्र

सव्वा तीन हजार उमेदवार ''कौशल्य''साठी पात्र

Published on

सव्वा तीन हजार उमेदवार ‘कौशल्य’साठी पात्र
जिल्हा पोलिस भरतीः सिंधुदुर्गातील १४२ रिक्त पदांसाठी मैदानी चाचणी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः जिल्हा पोलिस दलातील १४२ रिक्त पदांसाठी मैदानी परीक्षा संपली आहे. एकूण ५ हजार १७६ उमेदवार या मैदानी परीक्षेसाठी हजर राहिले होते. यातील ३ हजार २४२ उमेदवार पुढील कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
सिंधुदुर्ग पोलीस दलात रिक्त असलेल्या १४२ कर्मचारी पदांसाठी लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यातील ११३ शिपाई पदासाठी ५ हजार ९२०, पाच बॅन्डसमन पदासाठी ६८३ आणि २४ चालक पदासाठी एक हजार ३३९ अशाप्रकारे एकूण १८ हजार ४२ अर्ज प्राप्त झाले होते. या भरतीचा पहिला मैदानी परीक्षा हा टप्पा १९ जूनपासून सुरू करण्यात आला होता. ही मैदानी चाचणी आता पूर्ण झाली आहे. यातील पोलीस शिपाई या पदासाठी ३८५१ उमेदवार हजर राहिले होते. त्यापैकी २२५१ उमेदवार पुढील परीक्षेला पात्र ठरले आहेत. पोलीस शिपाई बॅन्डसमन या पदासाठी ४५१ उमेदवार हजर राहिले असून त्यापैकी ३२१ उमेदवार पुढील परीक्षेला पात्र ठरले आहेत. पोलीस शिपाई चालक या पदासाठी ८७४ उमेदवार हजर राहिले होते. त्यापैकी ६७० असे उमेदवार मैदानी चाचणीमधून पुढील परीक्षेला पात्र ठरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील भरती बंदोबस्तासाठी नियुक्त केलेले सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ, इतर प्रशासकीय विभागांनी भरती प्रक्रियेसाठी उपलब्ध करुन दिलेले अधिकारी यांनी त्यांची दैनंदिन कामे संभाळून ऐन पावसाळाच्या हंगामात भरती प्रक्रिया अथक परिश्रम घेवून अत्यंत नियोजनपूर्वक भरती प्रक्रिया पार पाडली, असेही अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले.

चौकट
योग्य नियोजन
भरती सुरु करण्यापूर्वी एक महिना अगोदर पूर्वनियोजन करण्यात आले. पावसामुळे मैदाने खराब होवून नयेत म्हणून त्यांची रात्रंदिवस दक्षता घेण्यात आली व ती मैदाने चाचणीसाठी योग्य असल्याची खात्री करुन चाचणी घेण्यात आली. भरतीसाठी लांबून येणारे उमेदवार बाहेर रस्त्यावर, फूटपाथवर राहू नये, त्यांचे सामान, बॅगा, कागदपत्रे भिजू नयेत यासाठी त्यांच्या निवासाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यांचेकडील बॅगा स्वतंत्र हॉलमध्ये ठेवून त्यांना टोकन देण्यात आले व त्या टोकनप्रमाणे बॅगा सुरक्षित परत देण्यात आल्या.

चौकट
सीसीटिव्ही कॅमेरे, व्हीडिओ शूटींग
भरती प्रक्रियेत आवश्यक त्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी हँन्डीकॅम कॅमेरातून आवश्यक व्हीडिओ शूटींग करण्यात आले. उमेदवारांना शंका, समस्या निर्माण झाल्यास तात्काळ कॅमेरे पडताळून त्यांचे निरसन केलेले आहे. तसेच, सर्व उमेदवारांना त्यांची गुणतालिका दाखवून त्यांचे समाधान झाल्यानंतर त्यावर स्वाक्षरी घेण्यात आलेली आहे. संपूर्ण प्रक्रियेत कोणत्याही उमेदवारांची गैरसोय झालेली नाही. पोलीस भरतीपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ज्या उमेदवारांना त्यांना नेमून दिलेल्या तारखेस हजर राहता आले नाही, अशा उमेदवारांना त्यांचे विनंतीप्रमाणे त्याबाबतची सबळ कारणे अभ्यासून भरतीसाठी प्रवेश देण्यात आला. उमेदवारांना आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ नये याकरीता दोन अॅम्ब्युलन्ससह डॉक्टरांचे पथक कार्यरत ठेवले होते.

कोट
मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या पोलीस शिपाई बॅन्डसमन व पोलीस शिपाई चालक यांची कौशल्य चाचणी रविवारपासून (ता.७) सुरु करण्याचे नियोजन आहे. तसेच, कौशल्य चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्व पदांच्या पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १:१० या प्रमाणात प्रसिद्ध करुन त्यानुसार पुढील लेखी परीक्षेचे प्रशासकीय सोयीनुसार नियोजन आहे. भरती संदर्भातील पुढील अद्यावत माहिती वेळोवेळी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वेबसाईडवर देण्यात येणार आहे. त्याबाबत उमेदवारांनी माहितीची पडताळणी करावी.
- सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.