कामगारांना तालुकानिहाय भांडी संच

कामगारांना तालुकानिहाय भांडी संच

Published on

कामगारांना तालुकानिहाय भांडी संच

भगवान साटम ः रत्नागिरीत बांधकाम कामगार संघाच्या बैठकीत निश्चित

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच व सुरक्षा संच वाटप एकाच वेळी तालुकास्तरावर केले जाणार आहे. भांडी संच व सुरक्षा संच वाटप नियोजन बैठक सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी यांच्यासोबत बांधकाम कामगार महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज रत्नागिरी येथे झाली. यात भांडी संच व सुरक्षा संच वाटप नियोजन कार्यक्रम निश्चित केल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीवित नोंदणी असलेल्या ५१७० एवढ्या बांधकाम कामगारांना लोकसभा निवडणुकीपूर्वी गृहोपयोगी ३० भांड्यांचा संच बांधकाम कामगार महासंघाच्या मागणीनुसार व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कामगारांच्या सोयीच्या दृष्टीने तालुकास्तरावर वाटप केले होते. मध्यंतरीच्या काळात आदर्श आचारसंहितेच्या कारणास्तव भांडी वाटप बंद केले होते. याबाबत बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांनी सहाय्यक कामगार आयुक्त तथा सरकारी कामगार अधिकारी संदेश आयरे यांच्याशी संपर्क साधून कामगारांना केले जाणारे भांडी संच वाटप जिल्हास्तरावर न करता कामगारांच्या सोयीच्या दृष्टीने तालुकास्तरावरच करण्याची विनंती केली होती.
या अनुषंगाने आज सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, दुकाने निरक्षक आर. बी. हुंबे तसेच भांडी संच वाटप ठेकेदार कंपनी व्यवस्थापक श्री. सॅम व श्री. लवेकर तसेच बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, तालुका प्रतिनिधी राजेंद्र आरेकर या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित रत्नागिरी येथे बैठक झाली. यावेळी महासंघाच्या मागणीनुसार तालुकावार भांडी संच वाटप कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
यानुसार मालवण तालुक्यातील जीवित नोंदणी असलेल्या सुमारे २ हजार एवढ्या बांधकाम कामगारांना येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे तर देवगड तालुक्यातील सुमारे २ हजार कामगारांना खरेदी-विक्री संघ सभागृह येथे ९ ते १४ जुलै या कालावधीत भांडी संच वाटप केले जाणार आहे. तसेच ज्या कामगारांना सुरक्षा संच मिळालेला नाही, त्या कामगारांना सुरक्षा संच वाटप केले जाणार आहे. कणकवली तालुक्यात १६ ते २१ जुलै कालावधीत नगरपंचायत हॉल, सावंतवाडी येथे १६ ते १८ जुलै कालावधीत नगरपरिषद हॉल येथे, वेंगुर्लेत १९ व २० जुलैसा साई मंगल कार्यालय येथे, कुडाळ २३ ते २८ जुलै पंचायत समिती हॉल येथे तसेच वैभववाडी, दोडामार्ग या तालुक्यांत २१ जुलैला बांधकाम कामगारांना भांडी वाटप संच व सुरक्षा संच वाटप करण्यात येणार असल्याचे नियोजन बैठकीत निश्चित करण्यात आले.
--
वस्तूंसाठी कुणालाही पैसे देऊ नका!
सिंधुदुर्गातील सुमारे १२ हजार बांधकाम कामगारांना भांडी संचाचा लाभ मिळेल. ज्यांना सुरक्षा संच मिळालेला नाही, त्यांना तोही मिळेल. दोन्ही वस्तूरुपी लाभ पूर्णतः मोफत असून, कामगारांनी यासाठी कोणासही पैसे न देण्याचे आवाहन संदेश आयरे यांनी केले. या वाटप शिबिराचा सिंधुदुर्गातील बांधकाम कामगारांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. ज्यांनी अद्याप आपल्या नोंदणीचे नूतनीकरण केले नाही, त्यांनी तातडीने भारतीय मजदूर संघ कार्यालय येथे ते करून घेण्याचे आवाहन श्री. साटम यांनी केले. सहाय्यक कामगार आयुक्तांनी बैठक घेऊन संच वाटप तारखा नियोजन निश्चित केल्याबद्दल श्री. साटम यांनी समाधान व्यक्त केले.
95123

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.