‘नेरुर आयडीयल’मध्ये पाककला उत्साहात

‘नेरुर आयडीयल’मध्ये पाककला उत्साहात

Published on

‘नेरुर आयडीयल’मध्ये पाककला उत्साहात
कुडाळ ः आयडीयल इंग्लिश मीडियम इको स्कूल नेरुर येथे रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. विविध प्रकारच्या ६० रानभाज्या या प्रदर्शनात ठेवल्या होत्या. महिला पालकांनी पाककला स्पर्धेत उत्साहाने भाग घेत उत्कृष्ट व चवदार पाककृती बनवून मान्यवर व परीक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व समजावे, रानभाज्यांचा आहारात कसा वापर करावा, याबाबतच्या मार्गदर्शनासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय लेखिका केटी बागली, विजया चक्रवर्ती, सोफिया कॉलेजच्या माजी उपप्राचार्य डॉ. मेधा राजाध्यक्ष, टाटा उद्योग समुहाचे कायदेशीर सल्लागार अनंत नेरुरकर, आरती नेरुरकर, नेरुर समृद्धी प्रतिष्ठान या संस्थेच्या चेअरमन डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख, सचिव डॉ. व्यंकटेश भंडारी, शाळेचे मुख्याध्यापक सौरभ पाटकर, उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण केटी बागली, विजया चक्रवर्ती व रानभाज्या अभ्यासक राजा शृंगारे यांनी केले. पाककृती स्पर्धेत प्रणाली गुरव, रोहिणी मयेकर व गायत्री राऊळ यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व आरती नेरुरकर यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना रानभाज्यांचे महत्त्व व त्यांची ओळख याविषयी राजा शृंगारे यांनी मार्गदर्शन केले.
95368

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.