यशासाठी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा

यशासाठी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा

यशासाठी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा

वैभव अंधारे ः सावंतवाडीत ‘हॉकर्स’तर्फे विद्यार्थी गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ : कष्टकऱ्यांचा व त्यांच्या मुलांचा सत्कार करणे फार आवश्यक आहे. आपली जबाबदारी पार पाडताना शिक्षणाकडेही अधिक लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन सावंतवाडीत नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशनच्या सावंतवाडी तालुका शाखेतर्फे तालुक्यातील सर्व फेरीवाल्यांचा वार्षिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हॉकर्सचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, जिल्हा सेक्रेटरी महेश परुळेकर, तालुकाध्यक्ष अजय जाधव, सेक्रेटरी यशवंत कृष्णा बेळगावकर, खजिनदार हनिफ खान, उपाध्यक्ष मोहन सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रिका राठोड, उपाध्यक्ष धनवंती चेंडके, उपखजिनदार सुभाष चव्हाण, बाबासाहेब दर्गावाले, सहसेक्रेटरी अशरत शेख आदी उपस्थित होते.
यावेळी दहावी-बारावीत विशेष यश प्राप्त करणाऱ्या २० मुलांचा भेटवस्तू, शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. अनेक वर्षे ज्यांनी फेरीवाले म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवत फेडरेशनसाठी काम केले, त्या फेरीवाल्यांचा व पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तब्बल दोनशे फेरीवाले आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. दरम्यान, कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक करणे हे पालिकेचे काम आहे. त्यामुळे नवीन बाजाराच्या जागेच्या समस्या, फेरीवाल्यांची वाढती संख्या यासंदर्भात जागा वाढवून मिळावी, सकाळी लवकर येणाऱ्या या फेरीवाल्यांना फिरते शौचालय उपलब्ध करून घ्यावे, गटार बंदिस्त करणे, वीज व्यवस्था करणे या गोष्टी तत्काळ पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हाध्यक्ष निंबाळकर यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी भूमिका अंधारे यांनी मांडली. महेश परुळेकर यांनी प्रास्ताविक केले. यशवंत बेळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष चंद्रिका राठोड यांनी आभार मानले.
95157

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com