लाडकी बहीण योजना बदणाम करणाऱ्यांना उत्तर द्या

लाडकी बहीण योजना बदणाम करणाऱ्यांना उत्तर द्या

Published on

rat६p१८.jpg-
२४M९५१५५
रत्नागिरी- ''मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण'' या योजनेतील लाभार्थ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंजुरीचे पत्र वितरण करण्यात आले.
---------

योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्या

पालकमत्री उदय सामंत ः ‘लाडकी बहीण’माध्यमातून महिला सक्षमीकरण, ४६ कोटींची तरतुद

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ६ : ''मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण'' ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. या योजनेचा लाभ मिळल्यानंतर शासनाला पत्र लिहून ही योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्यावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
''मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण'' या योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरण करून पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आज जिल्हास्तरीय प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, राहूल पंडित, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, राजन शेट्ये आदी उपस्थित होते. सामंत म्हणाले, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यावतीने मन:पूर्वक धन्यवाद देतो. उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी ४६ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एकाच दिवशी ५ हजार लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचा आजचा कार्यक्रम हा राज्यातील एकमेव कार्यक्रम आहे. ही योजना जनतेपर्यंत पोहचविणे अधिकाऱ्यांशिवाय शक्य नव्हते त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नसून वर्षानुवर्षांसाठी आहे. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाल्यानंतर शासनाला पत्र लिहून ही योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्यावे.
या योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत. महिलांना सक्षम करणारे शासन आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवून त्यांना लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा प्रथम क्रमांकाचा ठरेल. प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले. अंगणवाडी सेविकांमार्फत योजनेचे अर्ज भरण्यात येत आहेत.

चौकट...
तरुणांसाठीही योजना
६ हजार, ८ हजार आणि १० हजार विद्यावेतन तरुणांना देणारी योजना सुरू केली आहे. शुभमंगल योजनेचे अनुदान १० हजारावरून २५ हजार केले आहे. तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे. ७.५ एचपी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफीचा निर्णय घेतला असल्याचेही पालकमंत्री सामंत म्हणाले.

--------------
-
मंजुरीपत्र देणारा पहिला जिल्हा

प्रास्ताविकेत जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर शासनाच्या सर्वच लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी पारदर्शक आणि युद्धपातळीवर प्रशासन तत्पर आहे. या योजनेत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देणारा रत्नागिरी जिल्हा पहिला जिल्हा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.