कुडाळमधील आंबेडकरांचा पुतळा
हटवून जमीन मिळविण्याचा घाट

कुडाळमधील आंबेडकरांचा पुतळा हटवून जमीन मिळविण्याचा घाट

कुडाळातील आंबेडकरांचा पुतळा
हटवून जमीन मिळविण्याचा घाट

विलास कुडाळकर ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः कुडाळ शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवून ही जागा एका व्यक्तीला देण्याचा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घाट घातला आहे. संबंधितावर अनधिकृत बांधकामाचा आरोप आहे. अशा व्यक्तीला ही जागा मिळण्याबाबत शासकीय स्तरावर अहवाल तयार केले आहेत. आपल्या अधिकारांचा गैरवापर करून शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला जागा देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील महाराष्ट्र शासनाच्या नावे सातबारा असलेल्या या जमिनीची मोजणी व सातबारा तयार करण्याची प्रक्रिया कुडाळ नगरपंचायतीच्या मागणीनुसार २०१७-१८ मध्ये करण्यात आली. या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीमार्फत डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. दरम्यान, या ठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या एका व्यक्तीने या शासकीय जमिनीतील १.४५ गुंठे जमीन मिळावी, म्हणून मागणी केली. मुळात ही जमीन ७ गुंठे असून, कुडाळ नगरपंचायत व बांधकाम विभागाचे रस्ते या जमिनीच्या बाजूने जातात. त्यामुळे भविष्यात रस्ता रुंदीकरणामध्ये ही जमीन मोठ्या प्रमाणावर जाणार आहे. या शासकीय जागेमध्ये गेली अनेक वर्षे डॉ. आंबेडकरनगरमधील आंबेडकर अनुयायी जयंती उत्सव, महापरिनिर्वाण दिन, बौद्ध पौर्णिमा असे विविध उत्सव तसेच उपक्रम करीत आहेत. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, म्हणून आंबेडकर अनुयायांनी ही जमीन कुडाळ नगरपंचायतीला द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती; मात्र या मागणीचा कोणत्याही प्रकारे विचार न करता ही जागा संबंधित व्यक्तीला देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले खोटे दस्तऐवज बनवून व खोट्या पंचयाद्या घालून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मुळात या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा कोणताही संबंध नाही; मात्र संबंधिताच्या महसूलमधील अधिकाऱ्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे हा प्रकार सुरू आहे. हे सगळे करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
95160

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com