मोर्ले परिसरात
हत्तींचा धुडगूस

मोर्ले परिसरात हत्तींचा धुडगूस

Published on

मोर्ले परिसरात
हत्तींचा धुडगूस
दोडामार्ग ः मोर्ले गावात हत्तींनी घरालगत असलेल्या फळबागायतीत घुसून धुडगूस घातला. बागायतीच्या संरक्षणार्थ उभारलेली मातीची भिंतही उद्ध्वस्त केली. यात सुरेश गवस, प्रभाकर गवस, संतोष मोर्ये या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मोर्ले परिसरात स्थिरावलेल्या हत्तींनी गावातील लोकवस्तीत घुसून उपद्रव सुरू केला आहे. प्रभाकर गवस यांच्या घराजवळ असलेल्या फळबागायतीत कळप घुसला; मात्र सोबत असलेल्या पिल्लाला मातीची भिंत अडसर ठरू लागल्याने हत्तीने ती उद्ध्वस्त केली व आतील फणसावर ताव मारला. यावेळी झाडाचे नुकसान केले. सुरेश गवस व संतोष मोर्ये यांचेही नुकसान केले.
--------------
कृषी विभागामार्फत
दाभोलीत वृक्षारोपण
वेंगुर्ले ः जिल्हा कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी व तालुका कृषी अधिकारी वेंगुर्ले यांच्या हस्ते दाभोली येथील गुरुनाथ जोशी यांच्या बागायतीत विविध जातीच्या रोपांची लागवड केली. यावेळी तालुका मंडल कृषी अधिकारी हर्षा गुंड, जीवन परब, जीजी नाईक, लाडू जाधव, श्री. देसाई, ग्रामसेवक पिंगुळकर, अण्णा जोशी, नंदन बांदवलकर, बाळा हळदणकर विनायक बांदवलकर, उमेश जोशी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.