महिला सन्मान योजनेचा प्रारंभ

महिला सन्मान योजनेचा प्रारंभ

Published on

rat६p१७.jpg-
P२४M९५१४५
रत्नागिरी : शहरी वाहतुकीत महिला सन्मान योजनेच्या प्रारंभाप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, भैय्या सामंत, प्रज्ञेश बोरसे, संदीप पाटील आदी.
---------------

महिला सन्मान योजनेची सुरवात

प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत; पालकमंत्री सामंत यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. ६ : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शहरी वाहतुकीत महिला सन्मान योजना सवलतीचा प्रारंभ व प्रवास करणाऱ्या महिलांचा सन्मान पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी स्वा. सावरकर नाट्यगृहात करण्यात आला. या प्रसंगी रत्नागिरी शहरी वाहतुकीच्या एका बसचे कुंभमेळा बसमध्ये रूपांतर करण्यात आले. त्या बसला हिरवा झेंडा दाखवून व श्रीफळ वाढवण्यात आले.
रत्नागिरी विभागातर्फे शहरी वाहतुकीत लागू करण्यात आलेल्या महिला सन्मान योजनेत शहरी वाहतुकीत महिला प्रवाशांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना शहरी वाहतूक प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शहरी वाहतूक प्रवासभाड्यात १०० टक्के मोफत प्रवास सवलत योजना चालू करण्यात आली.
या कार्यक्रमास पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, रा. प. महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, महामंडळाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ यांच्यामार्फत विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर पासाचे अर्ज व ओळखपत्र मोफत वितरण मंत्री सामंत यांच्याकडून करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण वाहतुकीला लागू असलेल्या सवलती मंत्री सामंत यांच्या प्रयत्नाने महामंडळाच्या सांगली व रत्नागिरी विभागास लागू झाली आहे. त्यामुळे शहर वाहतुकीला एक प्रकारची नवसंजीवनी प्राप्त झाली असून, यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांना सुखकर प्रवास होण्यास मदत होणार आहे, असे प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.