राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत हरियाणा, गोवा संघ विजेता

राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत हरियाणा, गोवा संघ विजेता

Published on

-rat६p३.jpg-
२४M९५१०५
खेड ः लगोरी स्पर्धेतील विजेत्या मुलींच्या संघाला गौरवताना संस्थेचे प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर आणि मान्यवर.
-rat६p४.jpg-
P२४M९५१०६
लगोरी स्पर्धेतील विजेता मुलांचा संघ.
-----------

राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत गोवा, हरियाणा विजयी

डेरवण येथे आयोजन ; अमनकुमार, काजल सर्वोत्कृष्ट खेळाडू
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : डेरवण येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एसव्हीजेसीटी क्रीडासंकुलात अॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व महाराष्ट्र लगोरी संघटनेच्यावतीने आठव्या ज्युनिअर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेत भारतातील २१ राज्यांतून १८ मुलांचे व २० मुलींचे संघ अशा एकूण ६२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुलांच्या संघात गोवा आणि मुलींच्या संघामध्ये हरियाणा संघाने विजेतेपद मिळवले.
स्पर्धेत मुलांच्या गटात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात गोवा संघाने विजेतेपद तर महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. बिहार व झारखंड संघाने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार हरियाणामधील अमन कुमारला मिळाला. मुलींमध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये हरियाणा संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद गोवा संघाने मिळवले. तृतीय स्थान बिहार व उत्तराखंड संघाने पटकावले. मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बिहारमधील काजलला गौरवण्यात आले. याचबरोबर टार्गेट टीम लगोरी प्रकारात अरूणाचल प्रदेशविरुद्ध तामिळनाडू यांच्यातील अंतिम सामन्यात अरूणाचल प्रदेश संघाने विजय मिळवून चषक पटकावला. तृतीय स्थान पाँडिचेरी संघाने पटकावला. मिक्स डबल क्रीडाप्रकारात झालेल्या अंतिम सामन्यात कर्नाटकने विजेतेपद तर आसामने उपविजेतेपद पटकावले. दिल्ली संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
बक्षीस समारंभाला विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त विकास वालावलकर, भारतीय लगोरी संघटनेचे पदाधिकारी, बिहार लगोरी संघटनेचे रणदीर कुमार, हरियाणाचे सचिव जयवीर दुडी, आसामचे सचिव रितू ,अरूणाचल प्रदेशचे सॅनडी चॅरी व सहभागी सर्व राज्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.