कामथेत शुक्रवारी शिबिर

कामथेत शुक्रवारी शिबिर

कामथेत शुक्रवारी
दिव्यांग तपासणी शिबिर

चिपळूण : तालुक्यातील कामथे उपजिल्हा शासकीय रुग्णालयात १२ जुलैला सकाळी १० ते २ वाजेपर्यंत दिव्यागं तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणी शिबिरात अस्थिव्यंग मानसिक तसेच अंध या संबंधित दिव्यांगांची तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर फॉर्म भरणे व त्याची पावती घेणे गरजेचे आहे तसेच आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, जुने प्रमाणपत्र, जुने आजाराचे कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
---------
आंबवच्या विद्यार्थ्यांची
‘कॅम्पस’द्वारे निवड

साडवली ः आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात भारत गिअर्स या कंपनीद्वारे कॅम्पस मुलाखत झाली. यामध्ये राजेंद्र माने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. प्राचार्य प्रा. एन. बी. भोपळे यांनी भारत गिअर्स कंपनीचे एचआर मॅनेजर सागर जगे व इतर टीमचे स्वागत केले. या कॅम्पसमध्ये राजेंद्र माने पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल विभागातील देवांश वनकर, कार्तिक करंडे, श्रेयश कोळेकर, अनिकेत बच्चाव, दाऊद भाटकर, अनंत टक्के, रोशन गुरव व ऑटोमोबाईल विभागातील तुषार पांचाळ यांची निवड झाली.
-----------

-rat६p१५.jpg-
P२४M९५१३३
चिपळूण ः कापडी पिशव्या वाटपाप्रसंगी उपस्थित लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीचे सदस्य.

कापडी पिशव्यांचे
भाजीविक्रेत्यांना वाटप

चिपळूण : प्लास्टिकमुक्त चिपळूणसाठी लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीने पुढाकार घेतला आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या क्लबने शहरातील भाजीविक्रेत्यांसह ग्राहकांना सुमारे ५०० कापडी पिशव्यांचे वाटप केले. शहरातील जुना बसस्थानकसमोरील भाजीमंडई परिसरात हा उपक्रम लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. शमीना परकार यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. येथील डीबीजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यासाठी प्रा. अरूण जाधव यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, महिला पोलिस नाईक रूपाली देशमुख, लायन्स सेक्रेटरी आयेशा सरगुरोह, खजिनदार डॉ. सविता दाभाडे, नेत्रा रेळेकर, अक्षदा रेळेकर, सीमाताई चाळके, रूमा देवळेकर आदी उपस्थित होते. या वेळी भाजीमंडई ते चिंचनाकादरम्यान जनजागृती रॅली ही काढण्यात आली.
-------

दाभोळकर स्कूलचा
हर्षवर्धन भिंगेचे यश

चिपळूण : धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या हर्षवर्धन भिंगेने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला. त्याने रत्नागिरी जिल्ह्यात ८३वा आणि चिपळूण तालुक्यातून १८वा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल त्याचे तसेच यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिका प्रांजल सुर्वे, प्राजक्ता पवार, विद्या भिंगे, सेजल कदम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा पिटले व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांचे संस्थेने अभिनंदन केले आहे.
--------------

टिके शाळेत केंद्राची
शिक्षण परिषद

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील टिके फुटकवाडी नं. ४ शाळेत टिके केंद्राची शिक्षण परिषद झाली. पोमेंडी बीट विस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे, केंद्रप्रमुख सुतार यांच्या उपस्थितीत ही शिक्षण परिषद झाली. शाळेने केलेल्या कला कार्यानुभव विषयातील कलादालनाचे उद्घाटन या प्रसंगी झाले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात टिके फुटकवाडी नं. ४ शाळेने तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकावून एक लाखाचे बक्षीस मिळवल्याबद्दल टिके केंद्रामार्फत शाळा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षा, अभ्यासपद्धती, विज्ञानाची गोडी लागावी म्हणून विविध उपक्रम राबवण्याबाबत मार्गदर्शन मुरकुटे यांनी केले. या प्रसंगी सरपंच भिकाजी शिनगारे, उपसरपंच संजय भातडे, साक्षी फुटक, महेश आलीम, करिना गावडे, यशवंत आलीम, अमर अलीम, अरूण फुटक, प्रभावती फुटक, अंकिता कांबळे, संस्कृती फुटक, श्रद्धा फुटक उपस्थित होते.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com