-दाभोळे घाटात दरड कोसळली

-दाभोळे घाटात दरड कोसळली

Published on

-rat६p१९.jpg
P२४M९५१७६
ः देवरूख ः दाभोळे घाटात रस्त्यावर आलेली दरड.
----------------

दाभोळे घाटात दरड कोसळली

वाहनांच्या रांगा ; दोन तासानंतर वाहतूक सुरू
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ६ ः रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, मिऱ्या-नागपूर मार्गावर सायंकाळी चारच्यादरम्यान दाभोळे घाटात दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या.
दाभोळे घाटीत दरड कोसळल्याचे समजताच महामार्ग ठेकेदार कंपनीचे मशिन आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. चौपदरीकरणाचे काम करत असताना पुरेशी काळजी न घेतल्याने दरड कोसळली असण्याची शक्यता वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. मार्गाचे रूंदीकरण करताना जी डोंगरकटाई केली जाते त्या वेळी त्याला टप्पे ठेवले जात नाहीत तसेच डोंगराचे खोदकाम करत असताना त्याला आवश्यक तेवढा उतार दिला जात नाही. त्यामुळे दरडी कोसळत आहेत.
जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. दाभोळे घाटात पावसामुळे डोंगरावरील मातीचा मोठा ढिगारा अचानक रस्त्यावर आला. सुदैवाने ज्या वेळी माती रस्त्यावर आली त्या वेळी कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. संबंधित ठेकेदार कंपनीचे जेसीबी घटनास्थळी पोहोचले आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रस्त्यावरील मातीचा मोठा ढिगारा बाजूला करण्यात आला. यानंतरच दोन्ही बाजूला अडकलेली शेकडो वाहने मार्गस्थ झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.