-चिपळूण, खेडसह राजापूर पूरनियंत्रणासाठी निधी द्या

-चिपळूण, खेडसह राजापूर पूरनियंत्रणासाठी निधी द्या

Published on

‘चिपळूण, खेडसह राजापूर
पूरनियंत्रणासाठी निधी द्या’

चिपळूण, ता. ६ ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरनियंत्रणाच्या धर्तीवर चिपळूण, खेड, राजापूर येथील पूरनियंत्रणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास ही शहरे पुरापासून वाचवता येऊ शकतील, अशी मागणी करत आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले.
चिपळूण, खेड, राजापूर येथे दरवर्षीच्या पावसाळ्यात महापुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या समस्येकडे आमदार निकम यांनी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून ३२०० कोटींचा विकास आराखड्याप्रमाणे चिपळूण, खेड, राजापूर येथील पूरनियंत्रणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास ही शहरे पुरापासून वाचवता येऊ शकतील, असे निकम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.