-क्राईम

-क्राईम

पीरलोटे अपघातातील
जखमी वृद्धाचा मृत्यू

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध दुचाकीस्वाराचा अखेर मृत्यू झाला. तापस अवनी चौधरी (वय ७०, रा. पीरलोटे नवी वसाहत) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हितेश रामप्पा अमिन (रा. कर्नाटक) हे मोटारीने जात असताना पीरलोटे येथील सेवा रस्त्यावर हा अपघात झाला. यात चौधरी हे पडून गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावरच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
वेरळमधील घरफोडी
प्रकरणी गुन्हा दाखल

खेड ः तालुक्यातील वेरळ येथील समर्थ कृपा विश्व संकुलातील समर्थ अपार्टमेंटमधील सदनिकेसह जिजाई बंगला व दुवाँ पॅलेस बंगला फोडून चोरट्याने ८ हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेल्या अतुल अरूण गाडबैल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्याने एक हजार रुपये व अन्य साहित्य असा ३ हजार ८०० रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला. वैभव श्रीकांत गावड यांच्या मालकीचा जिजाई बंगला व संजय मोरे यांचा दुवाँ पॅलेस बंगला फोडून चोरट्याने ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
----
-rat६p२५.jpg -
२४M९५२०४
खेड ः कर्टेल येथे कोसळलेला गोठा.

गोठा कोसळून वासराचा मृत्यू

खेड ः तालुक्यातील कर्टेल येथे गुरूवारी (ता. ४ ) झालेल्या अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याचा गोठा कोसळून गाईच्या वासराचा मृत्यू झाला. कर्टेल येथील शेतकरी हरिश्चंद्र गंगाराम कदम यांचा गोठा गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात कोसळला. यामध्ये गोठ्यातील वासरू मृत्युमुखी पडले. या घटनेची माहिती मिळताच तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, या दुर्घटनेत सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी पाऊस ३४ मिमी झाला आहे. तालुक्यातील धामणंद मंडळात सर्वात जास्त ५७ मिमी तर कमी पावसाची नोंद भरणे मंडळात १० मिमी एवढी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com