वाफोलीत अपघातांची मालिकाच

वाफोलीत अपघातांची मालिकाच

Published on

वाफोलीत अपघातांची मालिकाच

कॅन्टरची भिंतीला धडक; आठ दिवसांत पाच दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः बांदा-दाणोली मार्गावर वाफोली येथे भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटून आयशर कॅन्टरने रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीला धडक दिली. हा अपघात आज पहाटे झाला. या मार्गावर वाफोली येथील धोकादायक वळणावर गेल्या आठ दिवसांतील आजचा हा पाचवा अपघात आहे.
सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही; मात्र गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक आपल्या ताब्यातील कॅन्टर घेऊन गोव्याहून बेळगावला जात होता. भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने कॅन्टर वाफोली येथील धोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर जाऊन धडकला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली.
या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू असून, गेल्या आठ दिवसांत या ठिकाणी पाच अपघात झाले आहेत. भरधाव वेगात वळणांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना फलक देखील लावले आहेत, तरीही अपघातांच्या संख्येत वाढच होत आहे. या अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली नाही.
95231

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.